ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जानेवारी 2024 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जानेवारी 2024 | रविवार
1. काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, 10 माजी नगरसेवक आणि 25 पदाधिकाऱ्यांचीही साथ http://tinyurl.com/2c82uk5s
2. लोकांची कामे करणाऱ्याला जनता कसे साफ करेल? घरात बसणाऱ्याला साफ करतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला http://tinyurl.com/mwj9abzc
3. जालन्यात 200 पिस्तुल घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून रसद, छगन भुजबळांचा दावा, तर भुजबळांनी पिस्तुल विकण्याचा धंदा सुरू केला आहे का? मनोज जरांगेंचा पलटवार http://tinyurl.com/yxfhmket
4. ग्रामपंचायतीला निधी न मिळाल्याने बच्चू कडूंची महायुतीच्या बैठकीला अनुपस्थिती, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू, बच्चू कडूंचं भाजपला पुन्हा आव्हान http://tinyurl.com/46xycs2s
5. मी शंकराचार्यांबद्दल काही चुकीचं बोललो नाही, पण हे चुकतं, ते चुकतं हा कुठला प्रकार? केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा प्रश्न, पत्रकारांनाही केली दमदाटी http://tinyurl.com/nhbbcd6e
6. मंत्री संदिपान भुमरेंना 15 टक्के द्यावे लागते, छत्रपती संभाजीनगरमधील सोसायटीच्या चेअरमनने अब्दुल सत्तारांसमोरच केली 'पोलखोल http://tinyurl.com/34hy78z5
7. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरूवात, 67 दिवसांत 110 जिल्ह्यांमध्ये प्रवास, महाराष्ट्रात होणार समारोप http://tinyurl.com/yp9zcc58
8. टेन्शन वाढलं! कोरोना संसर्ग वाढला, देशात JN.1 व्हेरियंटच्या रुग्णांचा आकडा 1200 पार http://tinyurl.com/5p7drhbs
9. संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपींच्या नार्को आणि पॉलीग्राफी टेस्ट नंतर पडद्यामागचा सूत्रधार समोर, ललित झा नव्हे तर मनोरंजन डी हाच खरा मास्टरमाईंड http://tinyurl.com/yz7evh85
10. रोहित अन् विराट 429 दिवसांनी टी-20 संघात; भारत-अफगाणिस्तान दुसरा T-20 सामना विनामुल्य कधी, कुठे आणि कसा पाहाल? http://tinyurl.com/5fspy3ka
एबीपी माझा कट्टा
पुस्तक छापताना किती खपेल याचा विचार करत नाही, भटकळ पिता-पुत्रांनी उलगडला माझा कट्ट्यावर 'पॉप्युलर'चा प्रवास http://tinyurl.com/43tp56a5
एबीपी माझा स्पेशल
वयाच्या 27व्या वर्षी खासदारकी, काँग्रेसचा सुसंस्कृत, सुशिक्षित चेहरा; दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आग्रही असणारे मिलिंद देवरा कोण? http://tinyurl.com/yhj9e9hj
Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w