ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2022 | गुरूवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2022 | गुरूवार
1. प्रवीण दरकरेंच्या हातून मुंबै बँकेची सूत्रे निसटली, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे अध्यक्ष https://bit.ly/3K3VsnH
2. वर्ध्याच्या आर्वीत कदम रुग्णालयाच्या आवारातून गर्भपात केलेल्या अर्भकाचे अवशेष, राज्यभर खळबळ, डॉ. रेखा कदम आणि नर्स संगीता काळे आधीच अटकेत, विरोधकांकडून कठोर कारवाईची मागणी https://bit.ly/3zY5wK3
3. एमपीएससीच्या गट क परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी ६ दिवसांची मुदतवाढ, वेबसाईटमधल्या तांत्रिक अडचणीसंदर्भात एबीपी माझाच्या वृत्तानंतर निर्णय https://bit.ly/3nmBVFb
4. कोरोनासंदर्भात पंतप्रधानांसोबत ३० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु, आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलांची उपस्थिती https://bit.ly/3FtNoJ3
5. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण, सोमवारी हायकोर्ट निर्णय देणार, तर 18 दिवसांनंतर नितेश राणे माध्यमांसमोर https://bit.ly/3A1RRBN
6. मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय घेण्याचा आचरटपणा कुणी करु नये, मनसे प्रमुखांचा राज्य सरकारला टोमणा, राज ठाकरेंच्या पत्रानंतर श्रेयवाद चव्हाट्यावर https://bit.ly/3nlTRQ4
7. विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेस गोव्यात सिंगल डिजिट, तर यूपीत शून्य जागा; दोन राज्यांत, दोन नेत्यांची भविष्यवाणी https://bit.ly/3GliLa6
8. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/3KbJWqq तर राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत बुधवारी मोठी वाढ; 24 तासात 46,723 रुग्णांची नोंद तर 32 जणांचा मृत्यू https://bit.ly/3K1SBLX
9. नागपूरच्या बॅडमिंटनपटू मालविका बनसोडकडून इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पराभूत https://bit.ly/3I31Lpu
10. Ind vs SA, 3rd Test, 3rd Day Highlights: पंतची एकाकी झुंज सुरु, भारताचा दुसरा डाव रंगतदार स्थितीत https://bit.ly/338q3Qo
ABP माझा स्पेशल
भारत-पाकिस्तान फाळणी झाली अन् दोन भाऊ वेगळे झाले; 74 वर्षांनंतर भेटले अन् हमसून हमसून रडले, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3qqac8E
रॉकेट शास्त्रज्ञ एस सोमनाथ ISROचे नवे प्रमुख; नवनियुक्त अध्यक्ष म्हणाले, इस्त्रो खासगीकरण नाही https://bit.ly/3npXKDT
ऊसावर उगवणाऱ्या तुऱ्यामागे लपलंय, कोट्यवधींचा आर्थिक गौडबंगाल! https://bit.ly/34N4vZY
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv