ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2024 | शनिवार
1. मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं, खंबीर नेतृत्वासाठी भूमिका बदलणं गरजेचं होतं, राज ठाकरेंचे नव्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण https://tinyurl.com/58yhxz96 मुख्यमंत्रिपदासाठी किंवा 40 आमदार फोडले म्हणून भाजपवर टीका केली नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा https://tinyurl.com/3te4cxsm
2. आम्ही हरितक्रांती, दूधक्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण करतो; पीएम मोदी धर्मावर 24 तास बोलतात; राहुल गांधींचा भंडाऱ्यातील सभेतून हल्लाबोल https://tinyurl.com/hk2ca5r4 'आमचं सरकार आल्यास पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना रद्द करणार; राहुल गांधींची मोठी घोषणा https://tinyurl.com/2s3r6vvp
3. गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून भाजपने 550 कोटी निधी घेतला, खासदार संजय राऊत यांचा पीएम मोदींवर घणाघात https://tinyurl.com/7k7pmpdb ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल, संजय राऊतांचा खोचक टोला https://tinyurl.com/y87853rv
4. सांगलीत संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नाव पुसलं, विशाल पाटलांनी फलक पुन्हा चमकवला, कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन https://tinyurl.com/mwmbc7p5 बोफोर्सच्या वादळात राजीव गांधींचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू निराधार, काँग्रेस नेते विशाल पाटलांच्या समर्थनार्थ लेखक विश्वास पाटील यांची पोस्ट https://tinyurl.com/2fs5hpmx
5. नाराज होणाऱ्यांपैकी मी नाही, मला खंत जरुर वाटली, यवतमाळमध्ये राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी तयार, शिवसेना खासदार भावना गवळींचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/3b4tvp7z मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाऊण तास बैठक, तरीही अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हातकणंगलेमधून लोकसभा लढवण्यावर ठाम! https://tinyurl.com/2en33raf
6. घराणेशाहीवरून राजकारण तापलं! रोहित पवार म्हणाले, देशात 70 टक्के घराणेशाहीवाले भाजपमध्ये, सुजय विखेंकडून जोरदार प्रत्युतर, म्हणाले,त्यांनी हे बोलणं म्हणजे मोठा विनोद https://tinyurl.com/54443hfh 2019 पासूनच राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र चालू होतं का? खासदार ओमराजे निंबाळकरांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल https://tinyurl.com/mr3ys64h
7. भाजपची अवस्था काँग्रेसप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही; सांगलीत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा भाजपला घरचा आहेर https://tinyurl.com/ypw8aake यंदाच्या निवडणुकीत प्रचाराचा 'शरद पवार पॅटर्न'! प्रणिती शिंदे, संजय जाधव अन् राजेश टोपेंचं भरपावसात भाषण https://tinyurl.com/26m977ns
8. 'नथुरामच्या भूमिकेसाठी शरद पोंक्षेंना पुरस्कार न देणं ही चूकच', अभिनेते संजय मोनेंनी व्यक्त केली खंत https://tinyurl.com/muffn6zx बॉलिवूड इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही; नेपोटिझमवर अभिनेत्री विद्या बालन संतापली https://tinyurl.com/y7zz55vm
9. वीकेंडला अवकाळी पावसाची हजेरी, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
https://tinyurl.com/4afr85ws पुढील पाच दिवस पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज, पिकांची काळजी घेण्याचे आवाहन https://tinyurl.com/yrejrf5j
10. आयपीएलमध्ये आज शिखर धवनची पंजाब किंग्ज संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सशी भिडणार, चंदीगढच्या मैदानावर रंगणार सामना https://tinyurl.com/uca2pj67 नाव मोठं, लक्षण खोटं, महागड्या खेळाडूंची सुमार कामगिरी, 17 कोटींची बोली लागलेल्या खेळाडूने तर लाज काढली! https://tinyurl.com/y7hw2mjr
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w