एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2021 | मंगळवार
- अकरावी प्रवेशासाठीची सीईटी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द, अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करण्याचे कोर्टाचे आदेश, 28 मे चा जीआर रद्द https://bit.ly/3CxGpi5
- हॉटेल, रेस्टॉरंट्सला दिलासा मिळण्याची शक्यता, धार्मिक स्थळं उघडण्याची अद्याप चिन्हं नाही, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू https://bit.ly/2X9bBE5
- ABP Majha Exclusive : राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच, अनागोंदी कारभाराचा 'एबीपी माझा'कडून पर्दाफाश https://bit.ly/3xB8aTd
- सुप्रीम कोर्टाचा भाजप, काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना दंड, निवडणुकीत उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर न केल्याने कारवाई, माकप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड https://bit.ly/3jK24Lg
- आरक्षणाबाबत राज्यांना अधिकार देण्याच्या 127 व्या घटनादुरुस्तीचं संसदेत चर्चा, विधेयकावर लोकसभेत मतदान सुरू https://bit.ly/3fMtXBy 50 टक्क्यांची मर्यादा शिथील केल्याशिवाय घटनादुरुस्तीचा हेतू सफल होणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन https://bit.ly/3yDsBjI
- पुणे मेट्रो मार्गातील अडथळे हायकोर्टाकडून दूर, राज्यातील बेकायदेशीर बांधकामांना दिलेला दिलासा महिन्याअखेर संपणार https://bit.ly/3yBmpcf
- आमदार-खासदारांच्या विरोधातील खटल्यांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या करू नये, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश https://bit.ly/3s4Za7K
- कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरला, गेल्या पाच महिन्यांतील सर्वात कमी रुग्णसंख्या, 24 तासात कोरोनाच्या नव्या 28,208 रुग्णांची भर https://bit.ly/3ivIXFv राज्यात सोमवारी 4,505 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 68 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3jIqTaI
- आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मान्यवरांकडून शोक व्यक्त https://bit.ly/3fMmfY8
- यंदा विराजमान होणार लालबागचा राजा; पाद्यपूजन सोहळा संपन्न https://bit.ly/3fRmdhD
ABP माझा स्पेशल :
- मुलगी प्रौढ, कमवती असेल तर पालन-पोषणासाठी वडिलांच्या पैशावर हक्क सांगता येणार नाही, न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय https://bit.ly/3yDJLO6
- अबब!, एका फेसबुक 'फ्रेंड रिक्वेस्ट'नं 'त्यांची' झाली चक्क 56 लाखांनी फसवणूक... https://bit.ly/3Ass5FR
- IPCC Report 2021 : जागतिक तापमान वाढीचा भारताला धोका, समुद्र पातळीत वाढ होऊन वारंवार पुराची शक्यता, IPCC च्या अहवालातून इशारा https://bit.ly/2VEUiuc
- Electoral bonds : भाजप मालामाल! इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाला 74 टक्के निधी, काँग्रेसला केवळ 9 टक्के https://bit.ly/2VHCdeK
- Elon Musk House : इलॉन मस्क यांचं 'इन्स्टन्ट घर' पाहिलंय का? छोट्याशा बॉक्समध्ये राहतोय अब्जाधीश! https://bit.ly/3iyd3rR
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
राजकारण
ट्रेडिंग न्यूज
Advertisement