स्मार्ट बुलेटिन | 09 मार्च 2021 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये....
1. मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना लगतच्या ठाण्यात 16 हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर, 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध
2. नाशिकसह नांदगाव, मालेगाव, निफाडमधल्या शाळा बंद, कोरोनामुळं जालन्यात शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ, नागपूर औरंगाबादेतही रुग्ण वाढल्यानं चिंता
3. स्कॉर्पिओसोबत दिसलेली इनोव्हा कार दुसऱ्यांदा अंबानींच्या घराबाहेर आली होती, ओळख लपवण्यासाठी ड्रायव्हरकडून पीपीई किटचा वापर
4. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही, महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीकडे लक्ष
5. अर्थसंकल्पात इंधनाच्या करात कपात न केल्यानं नाना पटोलेंचा नाराजीचा सूर, तर व्हॅटमध्ये वाढ केल्यानं दारूही महागली
6. कोलकातामध्ये रेल्वे कार्यालयाच्या इमारतीत भीषण आग, रेल्वे आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह ९ जणांचा मृत्यू
7. जेईईचा फेब्रुवारी सेशनचा निकाल जाहीर, अव्वल विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मुखर्जीचा समावेश
8. 'सर्वोच्च' निर्णयाने राज्यातील सहा जिल्हा परिषदेत राजकीय अस्थिरता, ओबीसी आरक्षणासंदर्भातील निर्णयानं 84 सदस्यांचं सदस्यत्व रद्द
9. सलग नवव्या दिवशी पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर, मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 रुपये तर डिझेलची किंमत 88.60 रुपये
10. उज्जैनमधल्या शिप्रा नदीत सलग होणाऱ्या स्फोटामुळं स्थानिकांमध्ये उलट-सुलट चर्चांना उधाण, गूढ उकलण्याचं भूगर्भ शास्त्रज्ञांसमोर आव्हान