एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 31 जुलै 2020 | शुक्रवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या सूचनेविरोधात सहा याचिकांवर आज सुनावणी 2. राज्यात काल 11 हजार 147 नव्या कोरोना बाधितांची नोंद, आजपर्यंतची 24 तासांतील सर्वाधिक वाढ, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 4 लाख 11 हजारांच्या पुढे 3. पुण्यात काल दिवसभरात साडेतीन हजारांहून अधिक रुग्णवाढ, तर 64 रुग्णांचा मृत्यू, पुण्यातील वाढता संसर्ग रोखण्याचं प्रशासनासमोर आव्हान 4. जगभरात कोरोनाचा कहर सुरुच, गेल्या 24 तासांत 2.80 लाख नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, आतापर्यंत 6.75 लाख रुग्णांचा मृत्यू 5. सांगली शहर आणि नगरपालिकांमधील 8 दिवसांचा लॉकडाऊन संपला, अटी-शर्थींसह आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता, रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 31 जुलै 2020 | शुक्रवार | ABP Majha 6. अमरावतीमध्ये कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगामधून स्वॅब, महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला असुरक्षित असल्याचा नवनीत राणा यांचा आरोप 7. अकोल्यात अज्ञात रोगाची मूग पिकावर धाड, पीक करपून चालल्यानं शेतकरी हवालदिल, कृषी विद्यापीठाकडून रोगाचा अभ्यास सुरु 8. ऑनलाईन खरेदी केलेल्या बकऱ्या मुंबईत आणण्यासाठी परवानगी का नाही? काँग्रेस नेते वसीम खान यांचा राज्य सरकारला सवाल 9. मुंबई महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्यापासून 20 टक्के पाणी कपात, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये कमी पाऊस झाल्यानं निर्णय 10. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता, दस्तऐवज देण्याची ईडीची बिहार पोलिसांकडे मागणी, मुंबई पोलिसांनीही चौकशी तात्पुरती थांबवलीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement