स्मार्ट बुलेटिन | 31 जानेवारी 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. उत्तर प्रदेशातील फारुखाबादमधील ओलीसनाट्य 8 तासानंतर संपलं, आरोपीच्या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह, मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर
2. आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन, 11 वाजता राष्ट्रपतींचं अभिभाषण तर दुपारी आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार
3. आर्थिक स्थिती पाहता जिल्ह्यांचं विभाजन शक्य नाही, नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या चर्चांवर अर्थमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण
4. देवेंद्र फडणवीसांनी सुरु केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडला ब्रेक लागण्याचे संकेत, तर भाजप सरकारकडून नियुक्त 19 साखर कारखान्यांचे संचालक हटवले
5. कोरेगाव भीमा हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आरोपानंतर भाजपचा संताप, आरोप सिद्ध करण्याचं सुधीर मुनगंटीवार यांचं आव्हान
6. पुण्यात उर्मिला सहभागी झालेल्या सीएएविरोधी जनआंदोलनात हिंदुत्त्ववादी संघटनेचा गोंधळ, घोषणाबाजी देणारे पोलिसांच्या ताब्यात
7. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 213 जणांचा मृत्यू, जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित, केरळमध्येही पहिला रुग्ण आढळला
8. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी खूशखबर, रेल्वेचं तिकीट वेटिंगवरच राहिल्यास त्याच दरात विमानप्रवास, रेलोफाय अॅपमधून भरपाई
9. कोकणचा हापूस वाशी एपीएमसीत दाखल, व्यापाऱ्यांकडून पेटीची पूजा, तर बदलापुरात शेतकऱ्याकडून स्ट्रॉबेरी पिकवण्याचा यशस्वी प्रयोग
10. भारत आणि न्यूझीलंडमधील चौथा ट्वेन्टी 20 सामना आज वेलिंग्टनमध्ये, टीम इंडियाचं पारडं जड, तर उर्वरित सामने जिंकण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न