स्मार्ट बुलेटिन | 2 नोव्हेंबर 2020 | सोमवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी आज राज्यपालांकडे, भगत सिंह कोश्यारी नावांना मंजुरी देणार की, आडकाठी करणार याकडे सर्वांचं लक्ष
2. एसटी महामंडळ मुंबईतील चार स्थानकं गहाण ठेवण्याच्या विचारात, कर्मचाऱ्यांच्या थकित पगारांसाठी एसटीचा विचार, 2 हजार कोटींचं कर्ज काढण्याचीही तयारी
3. बेस्टच्या सेवेसाठी बोलावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल, निकृष्ट दर्जाचं जेवण, तसेच क्वॉरंटाईन सेंटरमध्येही अस्वच्छता, हॉटेल बाहेर रस्त्यावर उतरत कर्मचाऱ्यांचं आंदोलन
4. मुंबईत आजपासून 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणी, महापालिकेचा उपक्रम; लक्षणं आढळल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन
5. मुंबई लोकल लवकरच पूर्वपदावर येण्याची शक्यता, मध्य रेल्वेकडून 522, तर पश्चिम रेल्वेकडून 201 फेऱ्यांमध्ये आजपासून वाढ
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 नोव्हेंबर 2020 | सोमवार | ABP Majha
6. ठाकरे पिता-पुत्रांमध्ये टेनिसचा सामना रंगला, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; बाजी कोणी मारली हे मात्र गुलदस्त्यात
7. गिलगिट-बाल्टिस्तान वरचा ताबा सोडा, भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; गिलगिट-बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य भाग, परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण
8. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गेल्यानं 30 हजार जणांना कोरोनाची लागण, तर 700 जणांचा मृत्यू, सॅनफोर्ड विश्वविद्यालयाच्या रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर
9. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आज 55वा वाढदिवस, कुटुंबियांसोबत शाहरुख यंदा मुंबईत, कोरोनामुळे वाढदिवस साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय
10. आयपीएलच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सकडून पंजाबचा 9 विकेट्सनं धुव्वा, पराभवासह पंजाबचं आयपीएलमधील आव्हानही संपुष्टात