एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 28 फेब्रुवारी 2021 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 28 फेब्रुवारी 2021 | रविवार | एबीपी माझा
1. खासगी रुग्णालयात 250 रुपयांना कोरोना लस मिळणार, 1 मार्चपासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2. सरकारी लॅबच्या तुलनेत खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह रिपोर्टचं प्रमाण अधिक असल्यानं संशयाची सुई, नाशकातल्या तीन खासगी लॅब्सवर तूर्तास बंदी
3. मराठा आरक्षणाच्या 8 मार्चपासून सुरु होणाऱ्या सुनावणीबाबत आज आढावा बैठक, मुख्यमंत्र्यासह रविशंकर प्रसाद, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार
4. संजय राठोडांना राजीनामा देण्याचे आदेश मिळाल्याची शिवसेनेच्या सूत्रांची माहिती, भाजपकडून सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
5. चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात एसीबीनं दाखल केलेल्या गुन्ह्यावरुन जोरदार राजकारण, सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप
6. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 16 मार्चपासून परीक्षा, इतर विद्यापीठांचंही लवकरच वेळापत्रक जाहीर होणार, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देण्याची मुभा
7. पश्चिम बंगालमध्ये ममता सत्ता राखणार, भाजपच्याही जागा वाढणार, तर तामिळनाडूत सत्तांतर, एबीपी न्यूज आणि सी व्होटरचा सर्व्हे
8. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात'मधून आज देशवासियांशी साधणार संवाद, काय बोलणार याकड सर्वांचं लक्ष
9. फ्लिपकार्टमधील डिलिव्हरी बॉयची करामत, कंपनीलाच लावला 8 लाखाचा चुना, नवी मुंबईत अटक
10. मुंबईकरांचा प्रवास आजपासून महागणार, रिक्षाचं भाडं 18 वरून 21 रुपयांवर, तर टॅक्सीचं किमान भाडं 32 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नागपूर
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion