एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 26 फेब्रुवारी 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. दिल्लीत हिंसाचार करणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे पोलिसांना आदेश, दिल्लीत शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, हिंसाचारात आतापर्यंत 13 जण दगावले
2. दिल्लीतील हिंसक आंदोलनाचे मुंबईत पडसाद, रात्री 11 वाजता एकत्र येण्याचा आंदोलकांचा प्रयत्न पोलिसांनी कडक बंदोबस्त देत हाणून पाडला
3. ट्रम्प दाम्पत्याला राष्ट्रपती भवनात शाही मेजवानी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून स्वागत, तर भारत-अमेरिकेत विविध करारावर स्वाक्षऱ्या, ट्रम्प मायदेशी रवाना
4. महिला अत्याचार थांबवण्यासाठी दिशा कायद्याच्या अनुषंगाने नवा कायदा तयार करणार, कायद्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना, 10 दिवसांत मसुदा सादर करणार
5. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गेल्या सहा महिन्यांत केवळ 14 जणांची साक्ष, हायकोर्टाचे एनआयएला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 फेब्रुवारी 2020 | बुधवार
6. सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देणाऱ्या ठाकरे सरकारकडून वचनभंग, देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर घणाघात, तर 50 हजार शेतकऱ्यांची पत्रं राज्यपालांना सुपूर्द
7. समृद्धी महामार्गाची चौकशी करा, विधानसभेत पृथ्वीराज चव्हाणांची मागणी, अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी जमीन लाटल्याचा आरोप
8. पुण्यात बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार अनिल भोसलेंसह 4 जणांना अटक, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत 71 कोटींच्या घोटाळ्याचा ठपका
9. विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांचा एकदिवसीय लाक्षणिक बंद, नवी मुंबईच्या एपीएमसीवर बंदचा परिणाम नाही, भाजीपाल्याच्या 500 गाड्यांची आवक
10. मुंबई महापालिकेच्या महसुलात दिवसेंदिवस घट, मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासनाकडून जप्तीची कारवाई सुरू, दोन हेलिकॉप्टर जप्त
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement