एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 22 फेब्रुवारी 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
-
- लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला, मुंबईतल्या मसीना बर्न रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- राधाकृष्ण विखे पाटीलही काँग्रेसमध्ये परततील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे संकेत, नाईलाजास्तव भाजपात गेल्याचं वक्तव्य
- अकोला प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची हत्या, अकोटच्या कबुतरी मैदानावर अज्ञातांकडून रात्री दोघांकडून पुंडकरांवर गोळीबार
- वारिस पठाणांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी, मुस्लिमांना चिथावणाऱ्या वक्तव्यानंतर ओवेसींची कारवाई, औरंगाबाद, बीड आणि पुण्यात पठाणांविरोधात आंदोलन
- सीएएला घाबरण्याची गरज नाही, नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
- उदयनराजेंचं पक्षातलं योगदान काय? राज्यसभेसाठी भाजपची अधिकृत उमेदवारी मागताना संजय काकडेंचा सवाल, प्रदेशाध्यक्षांचं सूचक मौन
- आज संघाच्या अंगणात भीम आर्मीचा मेळावा, अटी-शर्थींसह चंद्रशेखर आझाद उर्फ रावणाच्या सभेला न्यायालयाची परवानगी
- जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये पोलिस आणि अतिरेक्यांमध्ये चकमक, दोन आतंकवाद्याना कंठस्नान, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त
- ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी, फिरकीपटू पूनम यादवच्या चार बळींच्या जोरावर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी उडवला धुव्वा
- महाराष्ट्राच्या विकासाप्रती नव्या सरकारचं धोरण, तर विरोधकांची भूमिका काय? 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' सकाळी 10 वाजल्यापासून
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement