(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 20 जून 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद मिटला, राजू शेट्टी विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांची नाराजी दूर
2. एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल, तर महिलांमध्ये अमरावतीची पर्वणी पाटील पहिली
3. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्दच; एटीकेटीबाबत दोन दिवसात निर्णय, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती
4. भारतीय भूभागावर कुठल्याही देशाचा ताबा नाही, भारत-चीन तणावाबाबत सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी गरजले
5. मोदींनी खडसावल्यानतंरही चीनच्या उलट्या बोंबा सुरुच, गलवान खोरं आमचंच, भारतीय जवान चीनच्या हद्दीत घुसल्याची दर्पोक्ती
6. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 24 हजार 331 वर, मागील 24 तासात 3827 नव्या रुग्णांची नोंद, 1935 रुग्णांना डिस्चार्ज
7. मुंबई पाठोपाठ पुणे आणि नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, पुण्यात काल दिवसभरात 431 नवे रुग्ण, तर नाशिक शहरातील रुग्णसंख्या एक हजारांच्या पार
8. सर्व मुंबईकरांच्या कोरोना चाचणीसाठी मेगाप्लॅन, आयआयटी आणि मुंबई विद्यापीठाचं 'मुंबई मेगा लॅब' संकल्पनेवर काम सुरु
9. दक्षिण मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, माझगांव आणि डोंगरी भागाला जोडणारा हँकॉक ब्रिज लवकरच पूर्ण होणार, पहिल्यांदाच पुलिंग टेक्नॉलॉजीचा वापर
10. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन बॉलिवूडमध्ये आरोपांच्या फैरी सुरुच, कंगना रनौतचे जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप, अभय देओलचेही कंपूबाजीवर बोट