स्मार्ट बुलेटिन | 20 फेब्रुवारी 2021 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. विदर्भातल्या अकोला, अमरावतीत कडक लॉकडाऊन घोषित, आज रात्री 8 वाजल्यापासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी, लोकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी न करण्याचं आवाहन
2. अमरावती, यवतमाळमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा विषाणू परदेशातला नाही, आरोग्य विभागाची माहिती, यवतमाळच्या एक आणि अमरावतीच्या 4 नमुन्यांमध्ये नवा स्ट्रेन
3. पंढरपूर शहरासह लगतच्या 10 गावांत 24 तासांची संचारबंदी, माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय, एकाही दिंडीला किंवा भाविकाला प्रवेश नाही
4.शेतकरी नेते राकेश टिकैत यांची यवतमाळमधील महापंचायत रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय
5. विना हेल्मेट आणि विना मास्क पत्नीसोबत बाईकस्वारी करणाऱ्या विवेक ओबेरॉयविरोधात गुन्हा, मात्र नियमांचं उल्लंघन करणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात अद्याप कारवाई नाही
6. भाजपचा कुठलाही कार्यकर्ता बांग्लादेशचा नाही, पण, तुमच्या अध्यक्षा कुठल्या देशाच्या? भाजप नेते आशिष शेलार यांचा काँग्रेसवर निशाणा
7. अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोरोनाचा बाऊ, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा आरोप
8. दिल्ली हिंसाचार प्रकरणात 200 संशयितांचे फोटो जारी, ओळख प्रक्रिया सुरु
9. गलवान खोऱ्यातील हिंसाचारात PLA नं गमावले जवान; कबुली देत चीनकडून व्हिडीओ शेअर
10. नागराज मंजुळेंचा झुंड चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार, नाना पटोले चित्रपटाला विरोध करणार का याकडे लक्ष, झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका