स्मार्ट बुलेटिन | 17 नोव्हेंबर 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. लॉकडाऊनपासून बंद असलेली विदर्भाची पंढरी भक्तांसाठी सुरु, पहाटेपासून दर्शनाला सुरुवात, कालपासून सुरु झालेल्या मंदिरांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा
2. सॅनिटायझेशन आणि इतर उपाययोजनांसाठी सरकारने साहित्य पुरवावं, विनाअनुदानित खासगी शाळांचं सरकारकडे गाऱ्हाणं, पुढच्या आठवड्यात शाळा सुरु होण्याबाबत प्रश्नचिन्ह
3. नाराज सदाभाऊ खोत यांची मनधरणी करण्यात भाजपला यश, पुणे पदवीधर निवडणूकीतुन माघार घेत रयतचा भाजप उमेदवाराला पाठिंबा
4. मुलाच्या हातात मोबाईल देणं नागपूरच्या दाम्पत्याला महागात, सायबर गुन्हेगारांकडून 8 लाख 95 हजारांचा फटका, घरासाठी काढलेलं कर्ज गमावण्याची वेळ
5. बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसमध्ये खदखद, शिवानंद तिवारींचा राहुल गांधींच्या पिकनिकवर आक्षेप, तर कपिल सिब्बल यांचाही काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर निशाणा
6. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी सल्लागारांची बैठक बोलावली, बिहार निवडणूक आणि पोटनिवडणुकीतील पराभवाचं मंथन, संध्याकाळी पाच वाजता व्हीसीद्वारे बैठक
7. आमची लस 94.5 टक्के प्रभावी, मॉडर्ना कंपनीचा दावा, तर स्वदेशी भारत बायोटेककडून कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलची घोषणा
8. लस आली तरी कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव आपोआप थांबणार नाही, सतर्क राहणं गरजेचं, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचा इशारा
9. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार
10. बीसीसीआयच्या निवड समितीत तीन जागांसाठी चार अर्ज, अजित आगरकर आणि मनिंदर सिंह यांच्यात निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी चुरस