एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 17 मे 2020 |रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. सकाळी 11 वाजता चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर होणार, हॉटस्पॉटमधले निर्बंध वाढण्याची शक्यता, अर्थचक्राला गती देण्याचं महाराष्ट्रासमोर आव्हान
2. राज्यात काल दिवसभरात 1 हजार 606 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 67 रुग्णांचा मृत्यू, एका दिवसातली सर्वाधित वाढ, कोरोनााधितांचा आकडा 30 हजारापार
3. मुंबई-गोवा मार्गावर खारेपाटणजवळ वाहनांच्या लांब रांगा, तपासणी बंद झाल्यानं रात्रभर चाकरमानी ताटकळत
4. उद्यापासून नवी मुंबई एपीएमसीतील भाजी-धान्य मार्केट सुरू होणार, तर गुरूवारपासून फळ आणि कांदा-बटाटा मार्केट चालू होणार
5.कोरोनामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमधील स्मशानभूमीवरचा ताण वाढला, दादरच्या शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत मृतदेह आणण्यास स्थानिकांचा विरोध
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 मे 2020 | रविवार | ABP Majha
6. मुंबईतल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू, गृहमंत्र्यांकडून श्रद्धांजली, तर महानगरांमध्ये केंद्रीय सशस्त्र दल पोहोचल्याची देशमुखांची माहिती
7. संघाशी निगडीत भारतीय मजदूर संघाचा केंद्रावर निशाणा, केंद्राच्या खासगी गुंतवणुकीच्या धोरणाला कडाडून विरोध, लोकशाहीविरोध मागे घ्या अन्यथा आंदोलनाचा इशारा
8. संरक्षण क्षेत्रातल्या परदेशी गुंतवणुकीची मर्यादा 49 वरुन 74 टक्क्यांवर, अर्थमंत्र्यांची घोषणा, बाजारात आयुध निर्माण कंपन्यांचेही शेअर्स आणणार
9. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार, कालच ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटरसह कोरोनाच्या लसीच्या संशोधनात मदत करण्याची केली होती घोषणा
10. जगभरात 18 लाखांहून अधिक कोरोनामुक्त तर कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाखांवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement