Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 जून 2021 | बुधवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 जून 2021 | बुधवार | ABP Majha
1. कोरोनाला हरवण्यासाठी 151 दिवसात 26 कोटी डोस , अॅलर्जीमुळे आतापर्यंत एकाचा मृत्यू, भीती न बाळगता लस घेण्याचं आरोग्य मंत्रालयाचं आवाहन
2. कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक, ईडीची कारवाई, 512 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
3. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात आज कोल्हापुरात मूक आंदोलन, प्रकाश आंबेडकरही आंदोलनात सहभागी होणार
4. ओबीसी समाजाला न्याय मिळत नसेल तर ओबीसी कल्याण मंत्रालय बरखास्त करा, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची सरकारकडे मागणी
5. आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नाना पटोलेंचा नारा, तर शिवसेना, राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रयत्न, थोरातांचं वक्तव्य
6. पुण्यातील सासवडमध्ये मृतदेह आढळून आलेल्या महिलेच्या मुलाचीही हत्या झाल्याचं समोर तर पती अद्यापही बेपत्ता
7. जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्यांकडून आधी मेडिकल रिपोर्ट मागू नये, त्यांना उपचारास मदत करा, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश
8. नाशिकच्या दारणा नदीच्या पुलावरुन युवकाची उडी तर आंबोली घाटात अहमदनगरच्या युवतीची उडी, दोघांनाही वाचवण्यात यश
9. पासवान काका-पुतण्यामधील संघर्ष शिगेला, पाच खासदारांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा चिराग यांचा निर्णय
10. स्मार्टफोनच्या युझरसाठी जोकर नावाच्या मालवेअरचा धोका वाढला, अनेकांची खासगी माहिती चोरीला, आर्थिक फसवणुकीचं प्रमाणही वाढलं