एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 14 नोव्हेंबर 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, कोल्हापूरचे ऋषिकेश जोंधळे शहीद तर पाकचे बंकर उद्ध्वस्त 2. राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा, आजच्या संपाबाबत संघटना निर्णय घेणार 3. आपत्ती मदतीत केंद्र सरकारचं गलिच्छ राजकारण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा आरोप, राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याने सूड उगवल्याचीही टीका 4. ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालची सात तास चौकशी, एनसीबीला पूर्ण सहकार्य करण्याचं रामपालचं आश्वासन, ड्रग्ज प्रकरणात सहभाग नसल्याचाही दावा 5. भाजपमध्ये केंद्रीय कार्यकारिणीत असलेल्या राज्यातील नेत्यांना नव्या जबाबदाऱ्या, विनोद तावडे हरियाणा प्रभारी, मध्य प्रदेश सहप्रभारीपदी पंकजा मुंडे 6. खासदार संजय राऊत यांची स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामराने घेतलेली मुलाखत यू ट्यूबवर प्रदर्शित; कंगना, सुशांत राजपूत आणि भाजपवर भाष्य 7. महाराष्ट्रात काल 4 हजार 132 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 4 हजार 543 रुग्ण कोरोनामुक्त, मागील 24 तासात 127 रुग्णांचा मृत्यू 8. दिवाळीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं महाद्वार उघडलं, सोमवारपर्यंत भाविकांना महाद्वाराबाहेरुन विठुरायाचं दर्शन घेता येणार 9. दिवाळीनिमित्त विविध इमारतींना विद्युत रोषणाई, मुंबईतील सीएसएमटीसह दादर परिसर झळाळला, रामनगरी अयोध्याही सजली 10. लक्ष्मीपूजनाची सर्वत्र तयारी सुरु, दुकानांमध्ये सजावटीला सुरुवात, मुंबई शेअर बाजारात आज ट्रेडिंगचा मुहूर्त
आणखी वाचा























