स्मार्ट बुलेटिन | 13 नोव्हेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात, लस दिलेल्या कोणत्याही रुग्णाला कोरोना नाही, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची माहिती
2. जानेवारीत राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, आरोग्य विभागाकडून प्रशासनाला अलर्ट, गर्दी टाळण्याचं आवाहन
3. ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार, भाजप नेते किरिट सोमय्या यांचा दावा; चौकशीसाठी मदत करू नाईक कुटुंबियांचा सोमय्यांवरती पलटवार
4. अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कुणाल कामराचं सुप्रीम कोर्टावर टीका करणारं ट्वीट, कोर्टावर ट्वीट करणं कुणालला महागात, न्यायालयाच्या अवमान प्रकरणी खटला चालणार
5. केंद्र सरकारकडून ट्विटरला नोटीस, लेहचा भाग जम्मू-काश्मीरमध्ये दाखवला; पाच दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 नोव्हेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha
6. राज्यात ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वीज कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक, कर्माचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं वक्तव्य
7. राज्यात अंगणवाडी सेविकांना दिवाळीच्या तोंडावर खूशखबर, दोन हजार रुपयांची दिवाळी भेट, महिला आणि बालकल्याण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
8. नागपुरात डबल डेकर पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण, आजपासून नागपूरकरांचा प्रवास सुखकर होणार
9. मुंबई विमानतळावर क्रिकेटपटू कृणाल पांड्या ताब्यात, दुबईवरून येताना सोन्याच्या वस्तू आणल्यानं रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागाची कारवाई
10. धनत्रयोदशीनिमित्त बाजारात उत्साहाचं वातावरण, व्यापाऱ्यांकडून संध्याकाळी पूजा, सोन्याच्या खरेदीसाठी सराफा बाजारपेठ सजली