स्मार्ट बुलेटिन | 13 एप्रिल 2020 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. महाराष्ट्रात 221 नवे कोरोनाबाधित, राज्यातील रुग्णांची संख्या 1 हजार 982वर, दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू
2. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 हजार पार, आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू तर उपचारानंतर 764 रूग्ण कोरोनामुक्त
3. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार, जास्तीत जास्त कोरोना चाचणी होण्यासाठी सरकारचा निर्णय
4. कोरोनामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीच्या परीक्षाही होणार नाही, लॉकडाऊन संपल्यानंतर विद्यापीठांच्या परीक्षा होण्याचा अंदाज
5. कोरोनामुळे बळी गेल्याचं समजताच सोलापूरकर दहशतीत, मिळेल ते साहित्य वापरुन रात्रीत रस्ते सील, मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 एप्रिल 2020 | सोमवार | ABP Majha
6. नाशिकमध्ये मास्कचा वापर न करणाऱ्या 17 नागरिकांवर गुन्हा दाखल, साथीचे रोग अधिनियम कायद्यानुसार कारवाई
7. गोकुळ दुधाच्या टँकरमधून प्रवासी वाहतूक, मुंबईहून तीन प्रवासी कोल्हापुरात आणले, चालकासह तीन प्रवाशांवर गडहिंग्लज पोलिसात गुन्हा
8. लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा
9. इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेत आपत्ती कायदा लागू, देशातील 50 राज्यांत आपत्तीची घोषणा, आतापर्यंत 22 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू
10. पोलीस आणि डॉक्टरांवरील हल्ल्यामुळे अभिनेता अजय देवगण संतापला, सुशिक्षित असलेले असंवेदनशील लोकच सर्वात मोठे गुन्हेगार असल्याचं ट्वीट