एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 फेब्रुवारी 2020 | मंगळवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
-
- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, कलांमध्ये भाजपला मागे टाकत आपने बहुमताचा आकडा गाठला, दिल्लीकरांनी काँग्रेसला नाकारलं
- सुरुवातीच्या कलानंतर आम आदमी पक्षाचं कार्यालय सजलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, तर भाजपच्या दिल्ली कार्यालयात शुकशुकाट
- राज्यसभेत आज समान नागरी कायदा विधेयक येण्याची शक्यता, भाजपकडून राज्यसभेच्या खासदारांना व्हीप जारी
- आरे कारशेडला तज्ज्ञांनी पर्यायी जागा सुचवावी, सरकार त्यावर नक्की विचार करेल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची मागणी
- पुण्यात अॅसिड टाकण्याची धमकी देत शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, नाशकात कौटुंबिक छळाला कंटाळून महिलेचं पोलिसांसमोर आत्मदहन
- फास्टॅगच्या नावाखाली 20 कोटींची फसवणूक, रिचार्च करण्याच्या प्रक्रियेत फेरफार, कोट्यवधी लुटले, मुंबई सायबर सेलकडून चौघांना बेड्या
- मुंबई 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफला अखेर बेड्या, पाकिस्तानी पासपोर्टवर मुंबईतून दुबईला जात असताना कारवाई
- जगभरात मृत्यूतांडव घालणाऱ्या कोरोनोचं अर्थव्यवस्थेवरही सावट, पोल्ट्री उद्योग अडचणीत, टूर कंपन्यांना मोठा फटका, द्राक्ष निर्यातही थांबली
- छत्रपती शिवाजी महाराजांवर लवकरच हॉलिवूडपट, भारत सरकार आणि मार्टिनी फिल्म्स करणार निर्मिती, केंद्रीय मंत्री जावडेकरांची घोषणा
- भारत विरुद्ध न्यूझीलंड आज तिसरा एकदिवसीय सामना, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement