स्मार्ट बुलेटिन | 07 एप्रिल 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1.अत्यावश्यक यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सुखरुप घेऊ जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना दररोज तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर; परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा
2. कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर बारामतीत भाजीपाला, फळे आणि चिकन-मटणची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश, तर ठाण्यातील कळव्यातही पूर्णत: शटडाऊन
3. लॉकडाऊन 15 एप्रिलनंतर शिथील होईल असं गृहीत धरु नका, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य, 10 एप्रिलनंतर लॉकडाऊनची निर्णय प्रक्रिया सुरु होणार असल्याचीही माहिती
4. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावण्यास सांगूनही मशाली पेटवून झुंडीने रस्त्यावर उतरणं हा बेजबाबदारपणाचा कळस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संताप
5. महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करा, शरद पवार, रामदास आठवले यांच्यानंतर प्रकाश आंबेडकरांचंही आवाहन
6. गर्दी कमी झाली नाही तर मुंबईतील भाजीमंडई बंद करणार; वारंवार सूचना देऊनही गर्दी कायम असल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा
7. परभणीत शेतकऱ्यांच्या अभिनव संकल्पनेने बाजारातील गर्दी ओसरली, आठ शेतकऱ्यांकडून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भाजीपाला, फळांची घरपोच डिलिव्हरी
8. मलेरियाचं औषध न पाठवलं नाही तर आम्हीही जशास तसं उत्तर देऊ, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी, अमेरिकेतील मृतांचा आकडा दहा हजारांच्या पार
9. कोरोना पॉझिटिव्ह असलेले ब्रिटनचे पंतप्रधान बॉरिस जॉन्सन यांची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरु, परराष्ट्र मंत्री डॉमनिक रॉब यांनी कार्यभार सांभळला
10. बॉलिवूड निर्माता करीम मोरानीच्या दुसऱ्या मुलीलाही कोरोनाची लागण, अभिनेत्री झोया मोरानी कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु