स्मार्ट बुलेटिन | 03 नोव्हेंबर 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. सर्वसामान्य मुंबईकर लोकलच्या प्रतीक्षेत, पण अजूनही राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनात बैठक नाही, सरकारकडून बोलवणं आलं नाही, रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती
2. एफआरपी अधिक 200 रुपयांचा दर ऊसाला द्यावा, अन्यथा कारखान्यातून साखर बाहेर पडू देणार नाही, राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा
3. मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबतच्या अर्जावर लवकरच निर्णय, सरन्यायाधीशांचे सूतोवाच; तर मराठा-ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, अशोक चव्हाण यांचा आरोप
4. विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक अवैध ठरवा, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची हायकोर्टात याचिका, राज्य सरकारला बाजू मांडण्याचे निर्देश, याचिकेवर आज सुनावणी
5. मुंबईत कोरोनाची पिछेहाट सुरु, महिनाभरात सक्रीय कोरोना रुग्णांच्या संख्येत 29 टक्क्यांनी घट, 24 तासात मुंबईत केवळ 693 नव्या रुग्णांची नोंद
6. मुंबईत बेस्टसाठी सेवा देऊन सांगलीत परतलेल्या आणखी 46 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, तर 100 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
7. बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी मतदान; नितीश कुमार, तेजस्वी यादव यांच्यासह दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार
8. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवादी हल्ला, एकाचवेळी अनेक ठिकाण अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू तर 15 पेक्षा अधिक जखमी
9. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सची रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 6 विकेट्सनी मात, दिल्ली आणि बंगलोरचं प्ले ऑफचं तिकीट कन्फर्म
10. सहकलाकाराने शिवीगाळ केल्यानेच मालिका सोडली, 'माझी आई काळूबाई' मालिका तडकाफडकी सोडल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं एबीपी माझाकडे स्पष्टीकरण