एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन | 23 मार्च 2020 | सोमवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन | 23 मार्च 2020 | सोमवार
- मुंबई लोकलसह देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद, मेट्रो, मोनोची सेवाही रद्द, फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बससेवा उपलब्ध असणार, शहरांपासून खेड्यापाड्यात धावणारी एसटीही थांबणार
- कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांची घोषणा, नागरी भागात जमावबंदीचे आदेश, फक्त जीवनावश्यक वस्तूच मिळणार, मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात जमावबंदी लागू
- महाराष्ट्रात अकरा नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 75वर, तर देशातल्या रुग्णांचा आकडा 396 पार, मुंबई, पाटणा आणि सूरतमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू
- मुंबई आणि ठाण्यात वृत्तपत्र विक्रेते व्यवसाय बंद ठेवणार, आता दारोदारी वृत्तपत्र येणार नाहीत, 31 मार्चपर्यंत वृत्तपत्र न विकण्याचा पवित्रा
- नोटांची छपाई आणि पासपोर्टलाही कोरोनाचा फटका, 31 मार्चपर्यंत नाशिकची करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस बंद
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षार्थींची मागणी मान्य, पाच एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता 26 एप्रिलला होणार
- कोरोनामुळे जगभरात 14 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू, इटलीत मृतांची संख्या साडेपाच हजार, तर अमेरिकेत 24 तासात 100 जणं दगावली
- मुंबईतील नागपाड्यात सीएए आणि एनआरसीविरोधात सुरू असलेलं आंदोलन तब्बल 55 दिवसांनी स्थगित, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महिलांचा निर्णय, सोशल मीडियावर आंदोलन सुरूच राहणार
- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, हल्यात 17 जवान शहीद तर 14 जवान जखमी, नक्षली आणि जवानांमध्ये तब्बल तीन तास चकमक
- कोरोनामुळे वीज ग्राहकांना आता सरासरी बिल मिळणार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा बिल छपाई न करण्याचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement