एक्स्प्लोर
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 9 ऑक्टोबर 2021 शनिवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो. ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला गेलाय, तर क्रूझवरील पार्टीमध्ये भाजप नेत्याच्या मेहुण्याचा सहभाग होता असा नवाब मलिक यांचा गंभीर आरोप आहे, आज व्हिडीओच्या स्वरुपात ते पुरावे देणार आहेत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 9 ऑक्टोबर 2021 शनिवार : ABP Majha
- चिपी विमानतळाच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर येणार, शिवसेनेतल्या हप्तेखोरांची पोलखोल करण्याचा राणेंचा इशारा, ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष
- आता खड्ड्यांविना दीड तासात कोकण गाठणं शक्य, मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेला सुरुवात, कोकणातल्या सौंदर्याची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणं शक्य
- ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला
- क्रूझवरील पार्टीमध्ये भाजप नेत्याच्या मेहुण्याचा सहभाग, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप, आज व्हिडीओच्या स्वरुपात पुरावे देणार
- पुण्यात सोमवारपासून हॉटेल्स, कॉलेजेस सुरु होणार, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं मोठा दिलासा, तर नाशिकमधील निफाड, सिन्नर, येवलात चिंताजनक परिस्थिती
- पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनानं भाजपच्या ओबीसी जागर अभियानाला करणार सुरुवात, ठाकरे सरकार जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
- मुंबई क्रिकेटमधला सावळागोंधळा संपता संपेना, कार्यकारिणी सदस्य किरण पोवारांनी विशिष्ट खेळाडूच्या निवडीसाठी धमकावल्याचा सिलेक्टर आनंद याल्विगींचा आरोप
- एकाच आठवड्यात दुसऱ्यांचा फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्याने युजर्स पुन्हा हैराण, कंपनीनं मागितली माफी
- अफगाणिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटांनी हादरलं, कुंदूजमधील शिया मशिदीजवळ स्फोट, 100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
- हैदराबादचा 42 धावांनी पराभव करूनही मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये स्थान नाहीच, तर बंगळुरूचा दिल्लीवर शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
ऑटो
क्राईम
Advertisement