Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 8 फेब्रुवारी 2022 : मंगळवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...
1. ओबीसीसंदर्भात राज्य सरकारनं दिलेला डेटा वैध असल्याचा मागासवर्ग आयोगाचा निष्कर्ष, आता सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष, राजकीय आरक्षण पूर्ववत होण्याची चिन्ह
राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणाचे भवितव्य आज सुप्रीम कोर्टात ठरण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून आज होणाऱ्या सुनावणीसाठी ओबींसीचा डेटा तयार केला आहे. ओबीसींच्या डेटाला राज्य मागासवर्ग आयोगाने वैध ठरवले आहे. राज्य सरकारी प्रणालीतील ओबीसींची 32 टक्के ही संख्या आयोगाने वैध ठरवली आहे.
17 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू करता येणार नाही असा आदेश दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातल्या 105 नगर पंचायतींच्या निवडणुकाही दोन टप्प्यांत पार पाडण्याची वेळ आली होती. आयोगाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसीसाठी राखीव जागा या खुल्या प्रवर्गातल्या म्हणूनच गृहीत धरल्या जाव्यात असा आदेश कोर्टानं दिला होता.
2. देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, संसदेत मोदींचा गंभीर आरोप, मदत करणं गुन्हा असेल तर या गुन्ह्याचा अभिमान, काँग्रेसची भूमिका
3. दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी केंद्र म्हणून इमारती देण्यास मुंबई आणि विदर्भ शिक्षण संस्था महामंडळाचा नकार, वेतनेतर अनुदान मिळत नसल्याचा आरोप, आज अजित पवारांसोबत बैठक
4. संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
5. फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई शंभर टक्के अनलॉक, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचे संकेत, कोरोना रुग्णसंख्येतही घट तर आठवड्याभरात शंभर टक्के लसीकरणही पूर्ण होणार
फेब्रुवारी महिनाअखेरीपर्यंत मुंबई शहर 100 टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई शहरात दैनंदीन कोरोना रुग्णवाढीचा दर आटोक्यात आला आहे. सध्या शहरात दररोज 500 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून येत असून संपूर्ण शहरात सध्या केवळ एकच इमारत सील आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या आठवड्याभरात मुंबईत 100 टक्के नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण होणार असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहं, नाटय़गृहं, थीम पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली होती. तर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये 50 टक्के उपस्थितीला परवानगी दिली आहे. यासोबतच लग्नसमारंभासाठी 200 जणांच्या उपस्थितला परवानगी आहे. मात्र, रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळं निर्बंध आणखी शिथिल करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 8 फेब्रुवारी 2022 : मंगळवार
6. स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर झाला म्हणून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पिंपरीतल्या नेहरुनगरमधली घटना, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी
7. बुलढाण्यातील लोणारच्या राजू केंद्रेची नवी भरारी, फोर्ब्सच्या अंडर-३० यादीत झळकला, राजू केंद्रेच्या सामाजिक कार्याची फोर्ब्सकडून दखल
8. उत्तर प्रदेशात भाजपला 230च्या आसपास जागा, तर पंजाबमध्ये आप मुसंडी मारणार, सी-व्होटरचा सर्व्हे, गोव्यात भाजपच अव्वल राहण्याचा अंदाज
9. किआ आणि ह्युंदाईनंतर केएफसी आणि पिझ्झा हटचं काश्मीरसंदर्भात वादग्रस्त ट्विट, नेटिझन्सनं टीकेची झोड उठवल्यानंतर काही कंपन्यांचा माफीनामा
10. भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची उत्सुकता शिगेला, 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यांची 60 हजार तिकिटे तासाभरात संपली
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा