(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 7 फेब्रुवारी 2022 : सोमवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
१. बुलढाण्यातील शेगाव पोलीस स्टेशनवर अज्ञात समाजकंटकांचा हल्ला, फर्निचर आणि सामानांची तोडफोड, 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल
संबंधित परिसरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवणे, नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यावरच काहींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शेगाव शहर पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास एका ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या आवाजात डीजे पार्टी सुरू असल्याची तक्रार शेगाव शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाढदिवसाच्या पार्टीत सुरू असलेला डीजे बंद झाला. यानंतर काही वेळेनंतर काही अज्ञातांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. जवळपास 30 जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर धावून आला.
या जमावाने पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तोडफोड केली. पोलिसांनी या घटनेबाबत भाष्य करण्यास, माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी आठ ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. समाजकंटकांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्ला करत तोडफोड केल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सामान्य नागरिकांविरोधात कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस आता हल्लेखोरांविरोधात किती कठोर कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
२. वाळू उपशामुळे खड्डा झालेल्या पाण्यात बुडून चार मुलांचा दुर्देवी मृत्यू, बीडच्या गेवराई तालुक्यातील घटना, वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
३. राजेशाही असती तर पायाखाली चिरडले असते, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना इशारा तर खंडणीमुळे एमआयडीसीची वाढ खुंटली, शिवेंद्रराजेंचा पलटवार
४. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत अंतरिम अहवाल मागासवर्ग आयोगाकडून मुख्यमंत्र्यांना सादर, उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
५. किरीट सोमय्या प्रकरण चिघळण्याची शक्यता, हल्लेखोर शिवसैनिकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा, भाजपची मागणी
६. आज राज्यात सार्वजनिक सुट्टी मात्र शेअर मार्केट सुरु राहणार, म्हाडाची परीक्षाही होणार
७.पुढील दोन ते तीन दिवसात उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार, तर उत्तराखंडमध्ये पावसाचा अंदाज
८. भारतरत्न लता मंगेशकर पंचत्वात विलीन, देशभरात शोक, संसदेत आज श्रद्धांजली वाहिली जाणार, माझावर आज दिवसभर लतादीदींच्या आठवणींना उजाळा
९. स्पुटनिक लाईट लशीच्या आपत्कालीन वापराला डीसीजीआयची परवानगी, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती, भारतात मंजुरी मिळालेली नववी लस
१०. पंजाबमध्ये चरणजीतसिंह चन्नी काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, जालंधरमधल्या रॅलीत सिद्धूंच्या उपस्थितीत राहुल गांधींची घोषणा