Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 07 डिसेंबर 2021 : मंगळवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण, राज्यातला बाधितांचा आकडा 10 वर, रुग्णसंख्या वाढत असली तरी तात्काळ निर्बंध लावणार नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती
2. कामावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारीत वेतनवाढीनुसार पगार होणार, तर संपकऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा
3.ओबीसी राजकीय आरक्षणावरून ठाकरे सरकारसमोर मोठा पेच, इम्पेरिकल डेटासाठी दिरंगाई केल्याचा विरोधकांचा ठपका
4. शिवसेना काँग्रेसमध्ये वाढती जवळीक, संजय राऊत आज राहुल गांधींना भेटणार, उत्तर प्रदेशसह आगामी निवडणुकांच्या तोंडावर महत्त्वाची भेट
5. शिक्षिकेसोबत शारिरीक संबंध ठेवून व्हिडीओ बनवणाऱ्या विद्यार्थ्याला बेड्या, पतीसमोर भांडाफोड करण्याची धमकी देऊन 8 लाख उकळले
6. बुलढाण्यातील खामगावात चौथ्या दिवशीही वाघाची दहशत कायम; प्रशासन अलर्ट मोडवर, तर वनविभागाकडून शोधमोहीम सुरु
7. पाकिस्तानी महिलेने सीमेवर बाळाला दिला जन्म, 70 दिवसांपासून अटारी सीमेवर वास्तव्य करणाऱ्या जोडप्याकडून नवजात बाळाला बॉर्डर नाव
एका पाकिस्तानी जोडप्याने आपल्या नवजात बाळाचे नाव 'बॉर्डर' ठेवले आहे. याला कारण म्हणजे ज्या परिस्थितीत या बाळाचा जन्म झाला. हे जोडपे भारत-पाकिस्तानच्या अटारी सीमेवर इतर 97 पाकिस्तानी नागरिकांसह गेल्या 71 दिवसांपासून अडकले आहे. यादरम्यान महिलेने एका मुलाला जन्म दिला आणि अटारी सीमेवर बराच काळ अडकून पडलेल्या अशा परिस्थितीत बाळाचा जन्म झाल्यामुळे महिला आणि तिच्या पतीने आपल्या मुलाचे नाव 'बॉर्डर' ठेवले. या नवजात बालकाचे पालक, निंबूबाई आणि बालम राम हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील राजनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मुलाचा जन्म भारत-पाकिस्तान सीमेवर झाल्यामुळे त्याचे नाव बॉर्डर ठेवण्यात आल्याचं पालकांनी सांगितलं आहे.
8. अमेरिकेच्या इशाऱ्याला बाजूला ठेवत भारत आणि रशियामध्ये 28 करारांवर स्वाक्षऱ्या, दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याचा निर्धार
9. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; सुकेश चंद्रशेखरच्या यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी उद्या चौकशी
10. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा होणारच, आयसीसीकडून सुधारित वेळापत्रक जाहीर