Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 6 फेब्रुवारी 2022 : रविवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
1. अंडर-19 क्रिकेट विश्वचषकावर भारतानं पाचव्यांदा नावं कोरलं, अंतिम सामन्यात इंग्लंडला चारली पराभवाची धूळ, ५ गडी बाद करणारा राज बावा ठरला सामनावीर
ICC U19 World Cup 2022: अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला 4 विकेट्सनं पराभूत केलंय. या विजयासह भारतानं पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलंय. या शानदार विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संघातील प्रत्येक खेळाडूंना प्रत्येकी 40 लाखांचं बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे तर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील संघाचं अभिनंदन केलं आहे. गांगुली यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, शानदार पद्धतीने विश्वचषक जिंकल्याबद्दल 19 वर्षांखालील संघ आणि सहाय्यक कर्मचारी आणि निवडकर्त्यांचे अभिनंदन. आम्ही जाहीर केलेले 40 लाखांचे रोख पारितोषिकाचं कौतुक या खेळाडूंच्या कामगिरी आणि प्रयत्नापुढे तोकडं आहे, असं गांगुलींनी म्हटलं आहे.
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल अनेक राजकीय नेत्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात जाणार आहेत. सकाळी नऊ वाजता गडकरी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचणार आहेत.
3. शिवसैनिकांसोबत झालेल्या राड्यानंतर किरीट सोमय्या पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले, गंभीर दुखापतीमुळं संचेती रुग्णालयात उपचार, भाजपचा हल्लाबोल
4. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 50 टक्के जागांचे शुल्क सरकारी महाविद्यालयांप्रमाणे, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा महत्वाचा निर्णय
5. पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस कुणाचं नाव जाहीर करणार याची उत्सुकता शिगेला, विद्यमान मुख्यमंत्री चन्नी यांचं नाव आघाडीवर
6. मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू सरकार पोसतंय; संजय राऊत यांचा रोखठोकमधून हल्लाबोल
7. कट्टर राजकीय विरोधक मुंडे बहिण-भाऊ एकत्र, लातूरमध्ये लग्न सोहळ्यात दोन तास एकमेकांशी संवाद
8. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम, आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, मुंबईसह महाराष्ट्रातही पारा कमालीचा घसरला
9. लवकरच सुरु होणार 15 वर्षाखालील वयोगटाचे लसीकरण? केंद्र सरकारने मागवल्या 5 कोटी कॉर्वेवॅक्स लस
10. नवी मुंबईतील घणसोलीत माथाडी कामगारांच्या सोसायटीमध्ये गुंडांचा राडा, रहिवाशांना मारहाण, इमारत पुनर्बांधणीवरून दोन गट पडल्यानं वाद