Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 4 फेब्रुवारी 2022 : शुक्रवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
1. पुण्यातल्या येरवड्यात बांधकाम सुरु असलेल्या मॉलचा स्लॅब कोसळला, लोखंडी जाळीखाली अडकून 7 मजुरांचा जागीच मृत्यू
2. असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार करणाऱ्या दोघांना शस्त्रासह अटक, ओवेसींच्या वक्तव्यामुळं नाराज झाल्यानं हल्ला केल्याचा जबाब
3. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंच्या जामिनाचं काय होणार याकडे लक्ष, पीए राकेश परब आणि राणेंची समोरासमोर चौकशी
4. दारु आणि महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकरांचा माफीनामा, गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
5. जीपीएसच्या मदतीने पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फोडले; पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6. आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस, लोकल रद्द
Central Railway Jumbo Megablock: मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान आज मध्यरात्रीपासून 72 तासांच्या मेगाब्लॉकला सुरुवात होणार आहे. या जम्बो मेगाब्लॉकमुळे 350 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, 100 हून लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बहुप्रतिक्षित पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेवरील पाचवी आणि सहावी मार्गिका खुली झाल्यास लोकलच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
7.बीजिंग विंटर ऑलिम्पिकच्या उद्गाटन समारोहावर भारताचा बहिष्कार, आक्रमक पवित्रा
8. फोन पे अॅपच्या नावाखाली देशभरातील 14 ज्वेलरी शॉपसह 32 हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक
9'गोमूत्राचे डोस घेऊन या', TMC खासदार महुआ मोईत्रा यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल, ट्वीट व्हायरल
10 ISISच्या म्होरक्यानं कुटुंबासह स्वत:ला बॉम्बनं उडवलं; अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांनी 'ऑपरेशन' लाईव्ह पाहिलं!
ISIS : आयएसआयएसचा (ISIS) प्रमुख अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी (Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi) अमेरिकेच्या सशस्त्र दलाच्या कारवाईत ठार झाला आहे. अमेरिकन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी अल कुरेशीने त्याच्या कुटुंबासह स्वत:ला बॉम्बस्फोटाने उडवले. या मोहिमेदरम्यान कुरेशीसह 13 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मिशनमधील सर्व अमेरिकन सैनिक सुखरूप परतले आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने लाईव्ह पाहिले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha