एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 28 डिसेंबर 2019 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. मालमत्ता कराबाबत धोरण निश्चित होईपर्यंत 500 चौरस फुटांच्या घरमालकांना मालमत्ता करमाफ, महापालिकेकडून मुंबईकरांना दिलासा
2. 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्क्यांऐवजी 10 टक्के आयकराची शिफारस, 2020 च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता
3. अजित पवार उपमुख्यमंत्री होणार, पुणे राष्ट्रवादीकडून शपथविधीसाठी आज शुभेच्छांचा कार्यक्रम
4. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये घरवापसीसाठी इच्छुक, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेंसोबत बैठक केल्याची चर्चा
5. डोकं ठिकाणावर आहे का? नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीला परवानगी नाकारल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, तर काँग्रेसकडून आज शांती मार्चचं आयोजन
6. मुंबईतल्या असल्फा मेट्रो स्थानकाजवळ अग्नितांडव, थिनरच्या पिंपांचे स्फोट झाल्यानं भडका, जवळपास 25 गाळे भस्मसात झाल्याची माहिती
7. पुणेकरांसाठी मेट्रोसंदर्भात खूशखबर, मेट्रो कोचच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
8. एसटीच्या चालकांसोबत वाहकांनाही ऑन ड्युटी मोबाईल वापरण्यास बंदी; वाहकांमधून तक्रारींचा सूर
9. ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं निधन, रुटीन चेकअप सुरु असताना ह्रदयविकाराचा धक्का, आज अंत्यसंस्कार
10. दिल्लीत गेल्या 120 वर्षातील विक्रमी थंडी, तापमान तब्बल 3.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली, दिल्लीकर गारठले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
हिंगोली
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
Advertisement