Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 जुलै 2021 बुधवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 जुलै 2021 बुधवार | ABP Majha
1. पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता, अतिवृष्टीचा फटका बसलेले सात जिल्हे मदतीच्या प्रतीक्षेत
2. नवी मुंबईतल्या डोंगराळ भागात बेसुमार खाणकाम; दुर्घटनेच्या भीतीमुळं स्थानिकांचा जीव मुठीत, मुळशीजवळच्या रस्त्यावर तब्बल 40 फुटांचा खड्डा
3. पुराच्या पाण्यातून चिमुकलीला वाचवण्यासाठी सातारकरांची मानवी साखळी, वांग नदीवरचा पूल वाहून गेल्यानं ग्रामस्थांवर संकट
4. परमबीर सिंह यांच्यासमोरील अडचणीत वाढ, खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून SIT ची नेमणूक
5. महापालिका निवडणुकांसाठी राज आणि अमित ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, आजपासून मनसेच्या विभागप्रमुखांच्या थेट मुलाखती
6. बीएस येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर बसवराज बोम्मई यांची कर्नाटकाच्या नव्या मुख्यमंत्रीपदी वर्णी, भाजपकडून अधिकृत घोषणा
7. पॉर्न फिल्म प्रकरणी गहना वशिष्ठसह तीन प्रोड्युसरविरोधात गुन्हा दाखल, 120 नवीन पॉर्न व्हिडीओ पोलिसांच्या हाती, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ
8. उत्तर प्रदेशातल्या बाराबंकीमध्ये भीषण अपघात, रस्त्यालगत उभ्या असलेल्या डबलडेकर बसला ट्रकची धडक, 19 मजुरांचा जागीच मृत्यू
9. बँका, विमा कंपन्यांमध्ये 49 हजार कोटी रुपये धुळ खात पडून; खातेदार आलेच नाहीत, केंद्राची संसदेत माहिती
10. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पीव्ही.सिंधूची विजयी घौडदौड कायम, हॉंगकॉंगच्या खेळाडूला सरळ सेटमध्ये पराभूत करत प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक