एक्स्प्लोर

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 21 जानेवारी 2022 : शुक्रवार : ABP Majha

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो... 

1. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु असतानाही कॉलेज सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय नाही, तर सोमवारपासून राज्यभरातल्या शाळा सुरु होणार

2.  पाच वर्षांखालील मुलांना मास्क बंधनकारक नाही, आरोग्य मंत्रालयाची नवीन नियमावली, 6 ते 11 वयोगटातील मुलांना पालकांच्या निगराणीखाली मास्कचा वापर करण्याच्या सूचना

3. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, 'Why I Killed Gandhi' चित्रपटावरुन वादाची शक्यता, 2017 मधील चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

अमोल कोल्हे... राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार... मात्र अमोल कोल्हे म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंची भूमिका... मात्र हेच अमोल कोल्हे आता नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. होय तोच नथुराम ज्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलीय. कोल्हे यांच्या २०१७ साली चित्रीत झालेल्या WHY I KILLED GANDHI या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन वाद निर्माण झालाय. हा चित्रपट आता लाईमलाईट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटात कोल्हे यांनी साकारलेली भूमिका अनेकांना रुचलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही कोल्हे यांनी साकारलेल्या नथुरामच्या भूमिकेला विरोध केलाय. दरम्यान महात्मा गांधींजींच्या हत्येचं कधीही समर्थन केलेलं नाही असं कोल्हे यांनी म्हटलंय. तसंच नथुरामचं उद्दातीकरण केलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  

4. अभिनेता किरण माने आणि स्टार प्रवाहमधला वाद मिटवण्यासाठी राजकीय मध्यस्थी, मानेंसह वाहिनीचे प्रमुख सतीश राजवाडे जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला, वादावर तोडगा निघण्याची शक्यता

5. मुंबईकरांपाठोपाठ ठाणेकरांनाही दिलासा, 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा लवकरच निर्णय, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 21 जानेवारी 2022 : शुक्रवार

6. रुग्णालयातील महिला सफाई कामागारानं चुकीचं इंजेक्शन दिल्यानं बाळ दगावलं, मुंबईतल्या शिवाजी नगरमधल्या नूर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा

7. भाजपनं पणजीतून तिकीट नाकारल्यानंतर पर्रिकरांचे पुत्र उत्त्पल अपक्ष लढण्याची शक्यता, तर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरही बंडाच्या पवित्र्यात

8. हिंदू वारसाहक्क कायदा येण्यापूर्वीच्या प्रकरणातही महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

9. 23 ऑक्टोबरला क्रिकेटच्या मैदानावर हायव्होल्टेज सामना, टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार

10. टीम इंडियासमोर एकदिवसीय मालिका वाचवण्याचं आव्हान, दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget