एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 19 मार्च 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- मुंबईत आजपासून पन्नास टक्के दुकानं बंद, महापालिकेचा निर्णय, सरकारी कार्यालयातही 50 टक्के उपस्थिती, बसमध्ये उभ्यानं प्रवास करण्यास मनाई
- सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली, 31 मार्चनंतर नव्या तारखा जाहीर होणार तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 8 वाजता मोदी देशाला संबोधित करणार
- काल दिवसभरात 4 नवे रुग्ण आढळल्यानं राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 वर, मुंबई, पुणे आणि पिंपरीमध्ये नवे रुग्ण, तर परदेशात 276 भारतीयांना कोरोना
- कोरोनामुळं राज्यभरातली लग्नकार्य पुढे ढकलली, पुण्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातील सलून बंद, ऑनलाईन वीज भरण्याचं महावितरणचं आवाहन
- मुंबईत तब्बल 1 कोटीचं सॅनिटायझर जप्त, विनापरवाना ओमानला निर्यात करण्याचा डाव उधळला, नागपुरातही बनावट सॅनिटायझरच्या 1 हजार बाटल्या जप्त
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 मार्च 2020 | गुरुवार | ABP Majha
- कोरानामुळे नागरिकांमधील धास्तीचा गैरफायदा, कोरोना व्हायरसपासून बचाव करणारी गादी, भिवंडीत फसव्या जाहिरातदाराविरोधात गुन्हा दाखल
- इटलीत कोरोनामुळे आतापर्यंत दोन हजार नऊशे लोकांचा मृत्यू, चोवीस तासात 475 जणांचा जीव गेला, जगभरात दोन लाखांहून अधिक रुग्ण
- कोरोनासोबतच राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; काही जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पाऊस; फळबागांचं अतोनात नुकसान
- येस बँकेच्या खातेदारांना दिलासा, रिझर्व्ह बँकेने सर्व निर्बंध हटवले, 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार, तर बँकेच्या सर्व सेवाही सुरळीत
- कोरोगाव भीमाप्रकरणी शरद पवारांची 4 एप्रिलला साक्ष नोंदवणार, कोरोगाव भीमा चौकशी आयोगाकडून शरद पवारांना समन्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement