Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 सप्टेंबर 2021 शनिवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 सप्टेंबर 2021 शनिवार | ABP Majha
1. लसीकरणाचा विश्वविक्रम! पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनानिमित्त देशात एकाच दिवसात 2.5 कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण
2. मुंबईत महिला लसीकरण विशेष सत्राला भरघोस प्रतिसाद, तब्बल 1.27 लाख महिलांनी घेतली कोविड लस
3. मुंबईतल्या नागपाडा परिसरातून आणखी एक संशयित दहशतवादी ताब्यात, दिल्ली पोलिसांकडून या आधी 6 दहशतवाद्यांना अटक
4. एकत्र आलो तर भावी सहकारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार, तर राजकारणात काहीही होऊ शकतं, भाजप नेत्यांची सूचक प्रतिक्रिया
5. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, चौकशीला सहकार्य करत नसल्यानं ईडीची न्यायालयात धाव
6. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक तारिक परवीन ठाणे पोलिसांच्या ताब्यात, सूत्रांची माहिती, परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या खंडणीप्रकरणात कारवाई
7. गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील दुकाने बंद राहणार, फक्त अत्यावश्यक सेवा, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरू ठेवण्यात येतील
8. तिसऱ्या सेरो सर्व्हेत मुंबईतल्या 86 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडिज आढळल्या, गणेशोत्सवानंतर मुंबईसाठी पुढचे 15 दिवस महत्वाचे
9. मुंबईत डेल्टा व्हेरीयंट निष्प्रभ, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 376 नमुन्यांपैकी एकही केस डेल्टा प्लस नसल्याचं प्रयोगशाळेचं शिक्कामोर्तब
10. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही, राज्यांचा प्रस्तावाला विरोध, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारल्यानं इंधनदर पुन्हा भडकण्याची शक्यता