Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 18 डिसेंबर 2021 : शनिवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
१. सीएनजी-पीएनजी दराचा भडका, सीएनजी प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग तर घरगुती पाईप गॅसही दीड रुपयांनी महागला
२. सीरमच्या 'कोवाव्हॅक्स'ला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी, 18 वर्षाखालील मुलांचं लसीकरण लवकरच सुरु होणार
मुंबई : जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्होवॅक्स लसीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. सीरम इन्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोवोव्हॅक्स ही लस निर्णायक भूमिका बजावणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिननंतर वापराची मंजुरी मिळणारी कोव्होव्हॅक्स ही भारतातील तिसरी लस आहे. या लशीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाल्यामुळं आता 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग सुकर झाला आहे.
३. ग्रामीण महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, जुन्नरमध्ये सात नवे Omicron रुग्ण, राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 40 वर
४. कोरोनामुळं स्पर्धा परीक्षेची वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य सरकारचा दिलासा, विशेष बाब म्हणून एकदा परीक्षा देता येणार
५. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, अहमदनगरमधील देशातल्या पहिल्या सहकारी परिषदेत सहभागी होणार, साईबाबांच्या दर्शनानं दौऱ्याची सुरुवात
Amit Shah Maharashtra Tour : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Minister Amit Shah maharashtra Tour) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने शाह यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती असेल. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथं विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आलाय. अमित शाह पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत.
६. पेपरफुटीप्रकरणी परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर लष्करानं आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याचं सांगूनही कोणतीच कारवाई न झाल्याचं उघड
७. रेशनच्या गहू तांदळाचा काळाबाजार! मुंबईत मोठी कारवाई; आठ ते दहा कोटींचा माल जप्त
८. '18 वर्ष झाल्यावर पंतप्रधान निवडू शकतो तर पार्टनर का नाही', म्हणत मुलींचं लग्नाचं वय वाढवण्याला खासदार असदुद्दीन ओवेसींचा विरोध
९. अॅमेझॉनला फ्युचर ग्रुप डीलमध्ये दुहेरी झटका, भारतीय स्पर्धा आयोगाकडून दोनशे कोटींचा दंड, 2019मध्ये झालेल्या व्यवहारालाही स्थगिती
10 . राज्यभर श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष, दत्तजयंतीनिमित्त नरसोबाची वाडी, अक्कलकोटसह प्रमुख मंदिरात भक्तांची गर्दी