Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 17 फेब्रुवारी 2022 : गुरुवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
भाजपचे भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत, तेच चोरी कसे गेले, असा सवाल केलाय. तर रश्मी ठाकरेंच्या 19 बंगल्याचे वास्तव काय? किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे की खोटे याबाबत माहिती ABP माझाच्या हाती लागली आहे, कोर्लई गावच्या सरपंचांनी याबाबत ABP माझाला माहिती दिलीय.
सोमय्यांचा आरोप
अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.
मुंबई : संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. संजय राऊत शिवसेनेचे नाही तर शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली आहे, असा टोला देखील नारायण राणेंना संजय राऊत यांना या वेळी दिला आहे. महाराष्ट्रच्या इतिहासातील सर्वात लाचार मुख्यमंत्री सध्याचा आहे. शरद पवार, कॉंग्रेसवर टीका केली आणि आज त्यांच्यासोबत सत्तेसाठी बसले आहे, अशी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 2 हजार 748 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या किंचीत वाढली असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 5 हजार 806 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
Nitin Gadkari : रस्ते निर्मितीमुळं रोडकरी अशी ख्याती मिळवलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील असं आश्वासन नितीन गडकरींनी दिले. एवढंच नव्हे तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचंही गडकरींनी म्हटलं. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नितीन गडकरींनी प्रयागराजमधल्या सभेत उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सी-प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक प्रकल्पांचं आश्वासन उत्तर प्रदेशच्या जनतेला दिलं आहे.
काय म्हणाले गडकरी?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभेत म्हटले की, प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणारी बस धावणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी यांनी म्हटले की, प्रयागराजमध्ये बांधण्यात येणारा रिंग रोड आणि फाफामऊ येथील गंगेवर बांधण्यात येणारा सहा पदरी पूल 2024 पर्यंत पूर्ण होईल. हायड्रोजन इंधनाचा वापरही आता वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात ऊस मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्या मदतीने तयार करण्यात येणारा इथेनॉलचा वापर वाहन इंधनात करण्यात येईल. त्यामुळे पेट्रोलची किंमत 110 रुपयांहून 68 रुपयांपर्यंत येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.