Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 नोव्हेंबर 2021 : मंगळवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपकडून हिंसाचाराचा कट, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, तर रझा अकादमीच्या प्रमुखांना अटक करण्याची राणेंची मागणी
2. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा न्यायालयीन तिढा कायम, पुढील सुनावणी 22 नोव्हेंबरला, राज्य सरकारच्या समितीवर विश्वास नाही, कामगार संघटनेची भूमिका
3. अमरावती शहर वगळता जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी संचारबंदी; दुपारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता, अटकेतील भाजप नेत्यांना जामीन मंजूर
Amravati Violence : त्रिपुरातील कथित घटनेनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अमरावती शहर वगळता जिल्ह्यातील संचारबंदी सलग चौथ्या दिवशी कायम आहे. तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा आणखी 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. पण उद्यापासून इंटरनेट सेवा सुरु होते की, बंदच राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर तिकडे अमरावतीतील दंगल भडकवल्याप्रकरणी अटक केलेले भाजप नेते अनिल बोंडेंसह (Anil Bonde Arrest) सर्व भाजप नेत्यांना जामीन मंजूर झाला आहे. काल सकाळी अमरावती पोलिसांनी बोंडेंसह भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, गटनेते तुषार भारतीय, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्यासह 12 जणांना अटक केली होती.
4. राज्य भाजप कार्यकारणीची आज खलबतं, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात ठराव मांडणार
5. दिवाळीनंतर केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना बोनस, येत्या 8 दिवसांत 95 हजार कोटींचा निधी देणार, महसूलाच्या वाट्यातील दोन हप्त्यांमधील रकमेचे एकत्र वाटप
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 नोव्हेंबर 2021 : मंगळवार : ABP Majha
6. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचं नैनीतालमधील घर पेटवून देण्याचा प्रयत्न, सनराईज ओव्हर अयोध्या पुस्तकावरचा वाद चिघळला, खुर्शीद यांचा भाजपवर आरोप
7. दिल्ली प्रदूषणाबाबत सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये; पर्यावरण मंत्र्यांची तातडीची बैठक
8. सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसुळांना न्यायालयाचा दणका, अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळली
9. मुंबईतल्या कांजूरमार्ग परिसरातील अग्नितांडव आटोक्यात, सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटरसह सफोला तेलाच्या गोदामाचं मोठं नुकसान
Mumbai kanjurmarg Fire : मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील अपेक्स कंपाऊंडमध्ये असलेल्या सॅमसंगचा सर्विस सेंटरमध्ये लागलेली आग मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास नियंत्रणात आली आहे. काल रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 18 ते 20 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या. तब्बल साडे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
10. उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत न्यूझीलंडदरम्यानच्या पहिल्या कसोटीवर प्रदूषणाचं सावट, जयपूरसह सभोवतालच्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली