Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 डिसेंबर 2021 : गुरुवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. मुलींच्या लग्नाचं किमान वय अठरावरुन एकवीस करण्याचा केंद्र सरकारचा विचार, संसदेच्या याच हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर होण्याची शक्यता
मुलीच्या लग्नासाठी सध्या किमान 18 वर्षे वयाची अट आहे. मात्र लवकरच यात बदल होऊ शकतो. कारण मुलीच्या लग्नाचं किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्याच्या प्रस्तावावर सरकार दरबारी हालचाली सुरु झाल्या आहेत. या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून याविषयीचे संकेत दिले होते.
2. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालय कोणता कंदील दाखवणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष, काल सुनावणी टळल्यानं आज अंतिम निकालाची प्रतीक्षा
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला. त्यानंतर आज पेटा न्यायालयात बाजू मांडणार आहे. पेटाच्या युक्तिवादानंतर निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
3. इम्पिरिकल डेटा मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य सरकारची मागणी, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष, उमेदवार आणि मतदारांच्या संभ्रमात भर
4. विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती थेट राज्यपाल करू शकणार नाहीत, कायद्यातील बदलास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकारमधल्या वादाचा नवा अंक
5. मराठमोळे लष्कर प्रमुख एम. एम. नरवणेंच्या खांद्यावर आणखी एक मोठी जबाबदारी, सीडीएस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटीन : 16 डिसेंबर 2021 : गुरुवार : एबीपी माझा
6. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या विजयाचा सुवर्णमहोत्सव, एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट, थेट बांग्लादेशातून रिपोर्टिंग करणारं एकमेव मराठी न्यूज चॅनेल
7. मुंबईत 35 टक्के डेल्टा तर 2 टक्के ओमायक्रॉन, जिनोम सिक्वेसिंगच्या चाचणीचे निष्कर्ष; महापालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन
8. पालघरमधल्या दुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी ड्रोन उडणार, प्रयोग यशस्वी झाल्यास अवयव प्रत्यारोपणासाठी ड्रोनचा वापर करणार
9. अभिनेत्री आलिया भटकडून होम क्वॉरंटाईनच्या नियमांचं उल्लंघन, बीएमसीकडून 7 दिवसांचं क्वॉरंटाईन बंधनकारक, मात्र आलिया 5 दिवसानंतरच दिल्लीत
10. दौऱ्यापूर्वी शेरेबाजी योग्य नाही, माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा विराट कोहलीला सल्ला, बीसीसीआय आणि विराटमधल्या शीतयुद्धाची सर्वत्र चर्चा