(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 सप्टेंबर 2021 बुधवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 सप्टेंबर 2021 बुधवार | ABP Majha
1. ऐन सणासुदीत मुंबई, दिल्लीत घातपाताचा कट आखणाऱ्या 6 दहशतवाद्यांना अटक, दाऊदनं रसद पुरवल्याची माहिती
2. नीती आयोगाशी समन्वय ठेऊन राज्याच्या विकासाला आणखी गती देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
3. थकबादीसंदर्भात महावितरणाच्या सादरीकरणानंतर अनेक मंत्र्यांचे उर्जा खात्यावरच ताशेरे, 74 हजार कोटीच्या थकबाकीमुळं महावितरण महासंकटात
4. ओबीसी आरक्षणावरुन मंत्र्यांची टोलवाटोलवी सुरुच, ग्रामविकास खात्याकडून तातडीनं काम अपेक्षित, वडेट्टीवारांनी मुश्रीफांकडे चेंडू टोलावला
5. 72 तासांत लेखी माफी मागा अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकणार, भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या सोमय्यांना अनिल परबांची नोटीस
6. रोहित पवारांची भगव्याशी अशीही जवळीक, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात ज्युनिअर पवार उभारतायंत देशातला सर्वात उंच भगवा ध्वज
7. शुक्रवारपासून आयफोन 13 साठी प्री-बुकिंग करता येणार, मिनी मॉडेलसाठी सत्तर हजार तर प्रो मॅक्ससाठी 1 लाख 30 हजार रुपये मोजावे लागणार
8. जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, 44 जणांना 100 टक्के गुण तर 18 विद्यार्थ्यांना नंबर वनचं रँकिंग
9. अमरावतीतल्या नौका दुर्घटनेतील बेपत्ता 8 जणांचा अजूनही शोध सुरुच, नागपुरातील एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल
10. एका ब्लड टेस्टच्या माध्यमातून तब्बल 50 पेक्षा अधिक कॅन्सरचे निदान होणार, ब्रिटनमध्ये संशोधनाला सुरुवात