Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 जुलै 2021 बुधवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
![Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 जुलै 2021 बुधवार | ABP Majha ABP Majha smart bulletin 14 July 2021 Wednesday Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 जुलै 2021 बुधवार | ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/14/38bff41c5c6e3910e5ee2d5da25d0876_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 जुलै 2021 बुधवार | ABP Majha
1. राज्यात काल 7243 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 10,978 रुग्ण कोरोनामुक्त तर 196 जणांचा मृत्यू
2. एसईबीसी आणि ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत देण्यात आलेल्या नियुक्त्या कायम होणार
3. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा कोल्हापूरसाठी अतिवृष्टीचा इशारा, मुंबई आणि ठाण्यात संततधार, तर सिंदखेडराजामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस
4. पेट्रोल,डिझेलनंतर आता सीएनजी आणि पाईप गॅस महागला, सीएनजीच्या दरात अडीच रुपये तर पाईप गॅसच्या दरात 55 पैशांची वाढ
5. राज्यात 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अमरावतीत महिलाराजचं पर्व सुरु, तर अकोल्यात आयुक्त-जिल्हाधिकाऱ्यांची अदलीबदली
6. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा अदानी समूहाकडे; जीव्हीकेच्या नावे असणारा 50.5 टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे
7.आता तुरुंगातही मिळणार चिकन, मासे, श्रीखंड आणि आम्रखंड, कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांची माहिती, तुरुंग प्रशासनात मोठे फेरबदल होणार
8. कोल्हापुरातील महाद्वार रोडवर इमारतीचा भाग कोसळला, रस्त्यावर उभे असणारे थोडक्यात बचावले
9. पाय गमावले, पण जिद्द नाही, 2006 मध्ये झालेल्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटात पाय गमावलेले चिराग चौहान आता तीन कंपन्यांचे मालक
10. अमेरिकेच्या सैन्यानं माघार घेताच तालिबानिंकडून नरसंहार सुरुच, पाकिस्तानच्या 11 सैनिकांची हत्या, तर अनेकांचं अपहरण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)