Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 14 जानेवारी 2022 : शुक्रवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. देशात संपूर्ण लॉकडाऊन लागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत, कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेचं नुकसान न परवडणारं असल्याचं मत
2. मुंबईत दिवसभरात 13 हजार 702 कोरोनाबाधितांची नोंद, कालच्या तुलनेत रुग्णांमध्ये तीन हजारांनी घट, तर राज्यात काल दिवसभरात 46 हजार 406 कोरोना रुग्ण
3. मुंबै बँकेच्या चाव्या महाविकास आघाडीच्या ताब्यात, प्रवीण दरेकरांना मोठा धक्का, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रसाद लाड यांचा पराभव
गेल्या अनेक वर्षापासून मुंबै जिल्हा बँकेवरचे प्रवीण दरेकरांचे वर्चस्व आता संपुष्ठात आलं आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला आहे. दुपारी एक वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली.
आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सुरज चव्हाण यांनी शिवसेनेच्या तीन उमेदवारांची बैठक आयोजित केली होती. संख्याबळ जास्त असल्यानं अध्यक्षपद राष्ट्रवादीला द्यायचं यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आठ उमेदवारांना मिलिंद नार्वेकर आणि सुरज चव्हाण यांनी सह्याद्रीवर बोलावलं
4. वर्ध्याच्या आर्वीत अर्भकाच्या 11 कवट्या आणि 55 हाडं सापडली, गर्भपात प्रकरणात धक्कादायक प्रकार उघडकीस, महिला डॉक्टरसह परिचारिका अटकेत
5. मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय घेण्याचा आचरटपणा कुणी करु नये, राज ठाकरेंच्या पत्रानंतर श्रेयवाद चव्हाट्यावर तर वीरेन शाह यांच्या दुकानावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 14 जानेवारी 2022 : शुक्रवार
6. कोरोनाच्या सावटात देशभर मकर संक्रांतीचा उत्साह, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सजलं, तर अनेक राज्यात पंतगोत्सवावर बंदी
7. बिकानेर एक्स्प्रेसला पश्चिम बंगालमध्ये मोठा अपघात, सात जणांचा मृत्यू, पन्नासहून अधिक जखमी, रेल्वेमंत्री घटनास्थळाला भेट देणार
8. 'नाय वरनभात लोन्चा' चित्रपटातली आक्षेपार्ह दृश्य वगळली, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं महेश मांजरेकरांचं मत
9. केपटाऊन कसोटी रंगतदार स्थितीत, तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका 2 बाद 101, रिषभ पंतच्या शतकामुळं भारताची दुसऱ्या डावात 198 धावांची मजल
10. नोवाक ज्योकोविच अखेर ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार, संयोजकांकडून ज्योकोचा मुख्य ड्रॉमध्ये समावेश
सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित नोवाक ज्योकोविचचा विजनवास अखेर संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. ऑस्ट्रेलियन खुली ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होण्यासाठी एका आठवडय़ाहून कमी अवधी शिल्लक असतानाही ज्योकोविचच्या समावेशाबाबत अनिश्चितता कायम होती. मात्र आता वर्षातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनचा मुख्य ड्रॉ जाहीर झालाय. यांत जगातील नंबर वन खेळाडू आणि नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोवाक ज्योकोविचलाही त्यात स्थान मिळालंय.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live