Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 11 ऑक्टोबर 2021 : सोमवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकासआघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक, अत्यावश्यक सेवा आणि एसटी मात्र सुरळीत सुरु राहणार
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आज, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार आहेत.
2. महाराष्ट्रात कोळसा टंचाईचं संकट गडद, कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रातले 13 संच बंद, लोडशेडिंग टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरु
3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात आज महत्वाची बैठक, राज्यातील रखडलेले प्रकल्प आणि समस्यांविषयी चर्चा, अजित पवार आणि अशोक चव्हाणही बैठकीला हजर राहणार
4. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुनच्यावरही जामिनावर सुनावणीची शक्यता
5. क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघड, पालघरमधील दोघांची फसवणूक केल्याचा आरोप
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन : 11 ऑक्टोबर 2021 : मंगळवार : ABP Majha
6. आजपासून पनवेल-डहाणू मेमू पुन्हा ट्रॅकवर, नोकरदारांसह प्रवाशांचा दादरमार्गे प्रवास करण्याचा फेरा वाचणार
7. देशातील कोरोना प्रादुर्भावात घट; पण धोका कायम, राज्यात सातारा, पुणे, अहमदनगर आणि मुंबईत अजूनही दैनदिन रुग्णसंख्या तीनअंकी
8. भारत-चीन यांच्यातील बैठक तब्बल आठ तासांनी संपली, पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर चर्चा
9. बॉलिवूडचे शहंशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस, सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
10. दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज नवव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत, काल 300 च्या स्ट्राईकरेटनं धोनीची फलंदाजी तर आज बँगलोर आणि कोलकात्यात एलिमिनेशन सामना