Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 06 जानेवारी 2022 : गुरुवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...
1.राज्यभरात काल दिवसभरात 26 हजार 538 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, एकट्या मुंबईत 15 हजाराहून अधिक रुग्णांची भर, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा
2. बुस्टरसाठी आधी घेतलेल्या लशीचेच डोस देणार, कॉकटेल लशीच्या चर्चांना केंद्र सरकारकडून तूर्तास पूर्णविराम, तर क्वारंटाईनचा कालावधी सात दिवसांवर
10 जानेवारीपासून भारतात कोरोनाचे ( corona) दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लशीचा बुस्टर डोस ( Booster shot ) देण्यात येणार आहे. बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. कोरोना टास्क फोरचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी यांनी याबाबत माहिती दिली.
डॉ. वी. के. पॉल यांनी सांगितले की, बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, तीच लस बुस्टर डोस देण्यात येणार आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस देण्यात येईल तर ज्यांनी कोव्हिशील्ड लस घेतली आहे, अशांना कोव्हिशील्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल.
3 .राज्यभरातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद, 9 जिल्ह्यातील शाळाही बंद, ग्रामीण भागातल्या शाळांबाबत निर्णयाची प्रतीक्षा
4. मोदींच्या पंजाब दौऱ्यातल्या सुरक्षेच्या त्रुटीवरुन केंद्र सरकार आणि पंजाबमध्ये आरोप प्रत्यारोप, केंद्रीय गृहमंत्रालयानं मागवला अहवाल
5. भटिंडा विमानतळावर जिवंत पोहचू शकल्यानं पंजाब मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद, पंतप्रधानांची उपरोधिक प्रतिक्रिया, पंजाब दौऱ्यातल्या सुरक्षेच्या त्रुटीवरुन केंद्र आणि पंजाबमध्ये आरोप-प्रत्यारोप
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 06 जानेवारी 2022 : गुरुवार
6. ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणार की नाही? 17 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात निर्णय, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या याचिकेवरही सुनावणी
7. 13 फेब्रुवारी 2013 नंतरच्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची पडताळणी होणार, परीक्षा घोटाळ्यानंतर परीक्षा परीषदेचा निर्णय
8. सुरतमध्ये रासायनिक गळतीमुळं पाच जणांचा मृत्यू, 25 जणांची प्रकृती गंभीर, जीवघेण्या रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या दुर्घटनेनंतर मृत्यूतांडव
9. पालघरच्या समुद्रात माशांचं उत्पादन प्रचंड घटलं; लहरी हवामानामुळं मासेमारी संकटात, नव्वदच्या दशकात हजार टन मिळणाऱ्या पापलेटचं प्रमाण अवघ्या 70 टनांवर
10. जोहन्सबर्ग कसोटीत भारताच्या गोलंदाजाच्या कामगिरीवर विजय अवलंबून, दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 122 धावांची गरज