एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन : 04 सप्टेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
स्मार्ट बुलेटिन : 04 सप्टेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा
- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, मराठवाडा, विदर्भ, कोकणातल्या 15 जिल्ह्यांना अलर्ट
- भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे दाम्पत्याविरोधात 1 हजार पानांचं आरोपपत्र, ईडीनं अटक केलेले जावई गिरीश चौधरींचा जामीनही फेटाळला
- भिवंडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी, मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या स्वागताला प्रचंड गर्दी, पोलिसांनाही धक्काबुक्की
- तूर्तास निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार नाही, राजेश टोपे यांचं दिलासादायक वक्तव्य, तर पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ आणू नका, अजित पवारांचं आवाहन
- राज्यात काल दिवसभरात 4 हजार 313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 92 रुग्णांचा मृत्यू
- तिसरी घंटा वाजणार! राज्यातील नाट्यगृहे 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेनं सुरु होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
- 7. इम्पेरिकल डेटा गोळा झाल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सर्वपक्षीय बैठकीत एकमत, आगामी निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता
- 8. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये 3 राज्यांत भाजप सत्ता कायम राखणार, एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्व्हे
- 9. मास्क न घालणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची धडक कारवाई, एका दिवसात 6 हजारांहून अधिक लोकांकडून दंड वसूल
- रेल्वेत स्वस्तात गारेगार प्रवास करता येणार, लवकरच एसी-3 इकॉनॉमी क्लासचा समावेश होणार, तिकीट दर 8 टक्क्यांनी स्वस्त असणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement