(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 04 जुलै 2021 रविवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 04 जुलै 2021 रविवार | ABP Majha
1. उद्यापासून दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची रणधुमाळी, केंद्रीय कृषी कायद्याविरोधात ठराव मांडणार, राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट
2. सर्व आमदारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, सरकारची भूमिका
3. एमपीएससीच्या 'मायाजाला'चा बळी, पुण्यातल्या 24 वर्षीय स्वप्नील लोणकरची आत्महत्या, रखडलेली मुलाखत आणि वाढत्या कर्जामुळं मृत्यूला कवटाळलं
4. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही सोलापुरात आक्रोश मोर्चा काढण्यावर मराठा संघटना ठाम, उदयनराजे, संभाजीराजे आणि राणेंनाही निमंत्रण
5. साखर कारखान्यावरुन राजकारण सुरु, जरंडेश्वरप्रमाणे इतर साखर कारखान्यांच्या विक्रीचीही चौकशी करा, चंद्रकांत पाटलांचं अमित शाहांना पत्र
6. जळगावात राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; आमदार चिमणराव पाटलांचे स्वपक्षीय मंत्र्यावरच गंभीर आरोप
7. भिवंडीत वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या टोरंट पावरच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांची मारहाण; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
8. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर हातोडा पडण्याची शक्यता, रस्ता रुंदीकरणासाठी मुंबई मनपाची कारवाई
9. नेपाळ आणि उत्तर बिहारमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं अनेक नद्यांना पूर, शेकडो गावं पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी अनेकांचा 15 दिवसांपासून तराफावर मुक्काम
10. मेक्सिकोच्या समुद्राखालून गेलेल्या गॅस पाईपालाईनमधल्या गळतीनंतर मोठी आग, पाण्यातल्या अग्नितांडवावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु