ABP Majha Impact : संगमनेरमध्ये हॅन्ड मशीनने टोल वसुली करणारी कंपनी काळ्या यादीत, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचा निर्णय
Ahmednagar News Update : एबीपी माझाच्या बातमीनंतर हॅन्ड मशीनच्या साहाय्याने टोल वसुली करणाऱ्या ठेकेदार कंपनीला टर्मिनेट करत काळ्या यादीत टाकण्यात आलंय. नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर शहराजवळ ही टोल वसुली सुरू होती.
![ABP Majha Impact : संगमनेरमध्ये हॅन्ड मशीनने टोल वसुली करणारी कंपनी काळ्या यादीत, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचा निर्णय ABP Majha Impact Company blacklisting hand machine toll collection in Sangamner in Ahmednagar ABP Majha Impact : संगमनेरमध्ये हॅन्ड मशीनने टोल वसुली करणारी कंपनी काळ्या यादीत, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/e2d2f30f62565e9c638b29619ca4dab11667909577899328_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ahmednagar News Update : हॅन्ड मशीनच्या साहाय्याने टोल वसुली करणाऱ्या ठेकेदार कंपनीला टर्मिनेट करत काळ्या यादीत टाकण्यात आलंय. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने याबाबतचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर असणाऱ्या हिवरगाव टोल नाक्यावर मुख्य सिस्टीम बंद असल्याचं सांगत हॅन्ड मशीन वापरून पैसे वसुली होत होती. या वसुलीचा व्हिडीओ एबीपी माझाने समोर आणला होता. त्यानंतर हॅन्ड मशीनने टोल वसुली करणाऱ्या बालाजी टोलवेज या कंपनीचा ठेका रद्द करत या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर शहराजवळ हिवरगाव पावसा टोल नाका आहे. पाच वर्षापूर्वी बीओटी तत्वावर हा टोल नाका सुरू करण्यात आला आहे. सुरवातीला ILFS या कंपनीकडे याचा कारभार होता. यात रस्ते दुरुस्तीसह सर्व कामे ही कंपनी करत होती. मात्र आर्थिक तूट असल्याचं कारण देत हा टोलनाका भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर टोल वसुलीसाठी बालाजी टोलवेज या कंपनीला ठेका मिळाला. मात्र, टोल नाक्यावर मुख्य सिस्टीम बंद असलायचं सांगत हॅन्ड मशिनद्वारे पावत्या देत असल्याची चर्चा सुरू होती. हॅन्ड मशीनच्या साहाय्याने टोल वसुली करून सामन्यांची लूट करण्यात येत असल्याने नागरिकांमधून देखील या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे एबीपी माझाने हॅन्ड मशीनच्या साहाय्याने टोल वसुली करत असतानाचा व्हिडीओ समोर आणला.
स्थानिक पत्रकारांच्या मदतीने एबीपी माझाने स्टिंग करत हा सगळा प्रकार समोर आणल्यानंतर बालाजी टोलवेज कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला. एवढचं नाही तर या कंपनीला काळ्या यादीत टाकत भारतात कुठेही काम करता येणार नाही असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक अनिल गोरड यांनी दिलीय.
दरम्यान, हा टोलनाका सुरवातीला ILFS या कंपनीकडे सुपूर्द असताना 23 हजार झाडे न लावल्याने या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित लवादमध्ये तक्रार दाकल केली आहे. या संदर्भात ILFS या कंपनीकडून 2 कोटी रूपयांची वसुली करत लवकरच 23 हजार झाडे महामार्गावर लावण्यात येणार असल्याचं देखील गोरड यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
Jalgaon News : जळगाव पोलिसांची मोठी कारवाई, टोल नाक्यावर बोगस पावत्या देऊन लूट करणाऱ्यांचा पर्दाफाश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)