एक्स्प्लोर

ABP Majha Impact : आदित्य ठाकरेंची 'त्या' आदिवासी गावाला भेट, गावकऱ्यांची मागितली माफी

ABP Majha Impact : एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खरशेतला भेट दिली. त्या ठिकाणी पेयजल योजनेचे उद्घाटन केलं. 

नाशिक : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा साधेपणा आजच्या नाशिकच्या दौऱ्यात बघायला मिळाला. 'एबीपी माझा'ने खरशेतमधील महिलांची पाण्यासाठीची जीवघेणी कसरत दाखवताच आज दुपारी 1 वाजता खरशेत गावी पोहोचत लोखंडी पुलाची आदित्य ठाकरेंनी पाहणी केली. त्यानंतर जवळीलच शेंद्रेपाडा येथील आदिवासी पाड्याला त्यांनी भेट देत त्या ठिकाणच्या पेयजल योजनेचे उद्घाटन करत गावच्या महिलांना हांड्याने पाणी भरून दिले. विशेष म्हणजे या गावात आयोजित कार्यक्रमात मंचावरील खुर्च्यांवर न बसता आदिवासी बांधवांसोबत खाली जमिनीवर बसत त्यांच्याशी त्यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाषणात बोलतांना त्यांनी 'एबीपी माझा'सह माध्यमांचे आभार मानले आणि गावकऱ्यांची त्यांनी माफीही मागितली.

या ठिकाणी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही तुमची माफी मागितली पाहिजे की आतापर्यंत या गोष्टी झाल्या नाहीत. शहरीकरण वाढत असताना राज्यातील अजूनही काही भाग असा आहे की जिथं साध्या सुविधाही पोहचल्या नाहीत. मी एबीपी माझावर ही बातमी बघून शिवसैनिकांना सांगितलं आणि या ठिकाणी लोखंडी पूल बांधण्यात आला. पुढच्या तीन महिन्यात 13 पाड्यांवर घरोघरी पाणी देणार."

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, "तुम्ही अनवाणी चालत असता. इथल्या रस्त्यांवर दगड-गोटे असतात. मीडियाने आशा व्यथा आमच्याकडे पोहोचवाव्यात. पर्यावरण मंत्री म्हणून काम करताना मला अभिमान वाटतो, या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात."

आरे जंगलातील आदिवासी पाडे मुख्यमंत्री साहेबांनी वाचवले. या ठिकाणी मी मार्गदर्शन नाही करायला आलो तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 

एबीपी माझा इम्पॅक्ट
नाशिकमधील त्र्यंबकेश्वकच्या खरशेतच्या आदिवासी पाड्यातील महिलांची पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत होती. एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तत्काळ शिवसैनिकांना तास नदीवर लोखंडी पूल बसवण्याचे दिले होते आदेश दिले होते. त्यानंतर आता नळपाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने महिलांचे हाल थांबणार आहेत.  

संबंधित बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Drought Marathi News: देशाला आणि राज्याला दर्जेदार अधिकारी देणारे अधिकाऱ्यांचे गाव तहानलेले; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, गावकरी हळहळले!
देशाला आणि राज्याला दर्जेदार अधिकारी देणारे अधिकाऱ्यांचे गाव तहानलेले; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, गावकरी हळहळले!
RSS Vijayadashami: संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही संघाच्या मंचावर उपस्थिती
संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही संघाच्या मंचावर उपस्थिती

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Embed widget