एक्स्प्लोर
महाराष्ट्रात अव्वल स्थान कायम, एबीपी माझा देशातही दुसऱ्या स्थानावर
फेसबुकवर सर्वाधिक व्हिडिओ पाहिल्या जाणाऱ्या देशभरातील न्यूज चॅनेलच्या फेसबुक पेजमध्ये, एबीपी माझा दुसऱ्या क्रमांकावर आहे. एप्रिल महिन्यातील ही आकडेवारी आहे.

मुंबई : महाराष्ट्रात एबीपी माझा अव्वल क्रमांकावर कायम तर आहेच. मात्र फेसबुकवर सर्वाधिक व्हिडिओ पाहिल्या जाणाऱ्या देशभरातील न्यूज चॅनेलच्या फेसबुक पेजमध्ये, एबीपी माझा दुसऱ्या क्रमांकावर आहे. एप्रिल महिन्यातील ही आकडेवारी आहे.
सोशल व्हिडिओ अॅनालिटिक्स अँड मार्केटिंग कंपनी विडुलीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. एबीपी माझाच्या पेजवर एप्रिल महिन्यात 14.39 कोटी युझर्सने व्हिडिओ पाहिले. तर एबीपी न्यूज या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
एबीपी माझाचं फेसबुक पेज लाईक्सच्या बाबतीतही राज्यात अगोदरपासूनच अव्वल आहे. एप्रिल महिन्यात एबीपी माझाने देशात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. एबीपी माझाच्या फेसबुक पेजने नुकताच 40 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
एबीपी माझाच्या या कामगिरीमध्ये वाचक आणि प्रेक्षकांची साथ तर आहेच, शिवाय एबीपी माझाच्या डिजिटल टीमची मेहनतही तेवढीच महत्त्वाची आहे. एबीपी माझाच्या डिजिटल टीमकडून प्रत्येक ब्रेकिंग न्यूज, बातमी आणि व्हिडिओ पॅकेज प्रेक्षकांपर्यंत क्षणाक्षणाच्या अपडेटसह पोहोचवले जातात.
एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे ही कामगिरी केली आहे. सर्व प्रेक्षक आणि वाचकांचे मनापासून आभार. प्रत्येक बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हीही https://www.facebook.com/abpmajha या पेजला भेट देऊ शकता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
