एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2020 | रविवार
- अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्र लॉकडाऊन; संपूर्ण राज्यात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा https://bit.ly/3abOQBe
- मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा पूर्णपणे बंद; देशभरातील रेल्वे वाहतूकही 31 मार्चपर्यंत बंद तर, मुंबईतील बेस्ट बसची संख्या वाढवणार https://bit.ly/3bj2DpO
- महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागात धावणारी लालपरीही थांबणार; सरकारी एसटीसोबत खासगी बसेसही बंद राहणार https://bit.ly/3abOQBe
- महाराष्ट्रात 'जनता कर्फ्यू' दोन टप्प्यात, आजचा कर्फ्यू उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत कायम तर, काही राज्यांच्या सीमा बंद करण्याचा विचार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/2Ub728E
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद; राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकांनी मानले अत्यावश्यक सेवांमध्ये काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार https://bit.ly/3bk1SfU
- मुंबईत कोरोनाचा दुसरा बळी गेल्याने देशात मृत्यूंचा आकडा सात वर; राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 वरुन 74, तर देशात 341 जणांना कोरोनाची लागण https://bit.ly/3dkLI86
- छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 17 जवानांना वीरमरण; तर 14 जण जखमी; चकमकीत 8 ते 10 नक्षली मारल्या गेल्याचीही माहिती https://bit.ly/2QD4vSd
- कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची; महाराष्ट्र सध्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर https://bit.ly/39ecgEG
- एबीपी माझाचा अनोखा प्रयोग, अँकर्सनी केलं आपल्या घरातूनच बुलेटिनचं अँकरिंग; जनता कर्फ्यूला पाठींबा देण्यासाठी वर्क फ्रॉम होम https://bit.ly/2UrmYCz
- विदेशातून परतल्यानंतर 'बाहुबली' अभिनेता प्रभास स्वतःहून आयसोलेट; जॉर्जियाहून चित्रपटाचे शूटींग पूर्ण करून परतल्यानंतर निर्णय https://bit.ly/2UqSYql
BLOG | काळाच्या ओघात लुप्त झालेला महान मल्ल... शंकर तोडकर https://bit.ly/3abjJpb
BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क https://bit.ly/33H336S
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement