एक्स्प्लोर

ABP C Voter Survey : अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे? सर्वेक्षणातून जनतेनं दिलाय धक्कादायक कौल

Ajit Pawar : अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे? एबीपी सी-व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणात जनतेनं दिलाय धक्कादायक कौल...

ABP C Voter Survey: शिवसेनेतील (Shiv Sena) बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळीच कलाटणी मिळाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. न भूतो, न भविष्यती अशा अनेक घटना राज्याच्या राजकारणात घडताना पाहायला मिळाल्या. शिवसेनेत प्रबळ नेते समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) काही आमदारांसह बंड केलं आणि भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री पदी विराजमान झाले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). पण आता चित्र काहीसी बदलंलं आहे. बंडानंतर चर्चेत असलेले एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. तसेच, राज्याच्या नव्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? यासंदर्भातही चर्चा सुरू आहेत. 

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. पण अशातच सध्या चर्चेत आहेत, ते राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते (Maharashtra Assembly) अजित पवार (Ajit Pawar). काही दिवसांपूर्वीच याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला आली. आठवडाभरापूर्वी अजित पवार नॉट रिचेबलच्या बातम्या आल्या अन् संपूर्ण राज्याच्या नजरा राष्ट्रवादीकडे (NCP) खिळल्या. राज्यात दुसरा भूकंप होणार की, काय? असा प्रश्न उपस्थित झाला. संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांकडून 'भावी मुख्यमंत्री अजित पवारच' अशा आशयाचे पोस्टर्स झळकले. 

अजित पवार हे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि शरद पवार (Sharad Pawar News) यांचे पुतणे आहेत. अजित पवार मुख्यमंत्री पदी नेमके कसे विराजमान होणार? अजित पवार बंड करणार का? शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून अजित पवार भाजपमध्ये जाणार? असे अनेक प्रश्न राज्याच्या राजकारणात चर्चेत होते. पण यामध्ये आणखी एक प्रश्न चर्चेत होता, तो म्हणजे, अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का? याच प्रश्नाच्या आधारावर सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं आहे. या प्रश्नावर बोलताना जनतेनं आपलं मत व्यक्त केलं आहे. जाणून घेऊयात सविस्तर... 

अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे?

  • होय : 30 टक्के 
  • नाही : 33 टक्के
  • माहित नाही : 37 टक्के

एबीपी न्यूज-सी व्होटर सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 30 टक्के लोकांनी सांगितलं की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. मात्र, सध्याच्या विरोधी पक्षनेत्याकडे मुख्यमंत्री होण्याची क्षमता नाही, असं मानणारे सर्वाधिक 33 टक्के लोक आहेत. तसेच, अजित पवार यांच्यात क्षमता आहे की नाही, याबाबत काहीच अंदाज नसल्याचं 37 टक्के लोकांचं म्हणणं आहे. 

भाजपमध्ये जाणार? अजित पवार म्हणाले... 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावरुन राजकीय वर्तुळात अनेकांनी दावे-प्रतिदावेही केले. मात्र यासर्व चर्चांवर प्रतिक्रिया देत खुद्द अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं. जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीच राहणार, असं अजित पवार म्हणाले. अशा बातम्यांना जाणीवपूर्वक हवा दिली जाते, असंही ते म्हणाले होते. मात्र, या वक्तव्यानंतर ते मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अजित पवारांचं नेमकं चाललंय काय? याच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Embed widget